देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update Today : थंडीची प्रतीक्षा कायम! पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज
Weather Update Today : देशात थंडीची (Cold Weather) प्रतीक्षा अद्याप कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडेल. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आज केरळ, तामिळनाडू आणि आज लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 डिसेंबरपर्यंत सिक्कीम, बंगालमध्ये भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : राज्यात गारठा वाढणार! पुढील 24 पावसाची शक्यता, हवामान कसं असेल? जाणून घ्या
Maharashtra Weather Update Today : राज्यासह देशातील हवामान (Weather Forecast) सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. डिसेंबर (December) महिना संपायला आला तरी, दरवर्षीप्रमाणे थंडी (Winter) पडलेली नाही. त्याउलट कधी ऊन तर कधी पाऊस (Rain) असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तवली आहे. वाचा सविस्तर...
महुआ मोईत्रांवरील कारवाईने राजकारण तापलं, कॅश फॉर क्वेरी प्रकरणी लोकसभेतून निलंबन
Mahua Moitra: लोकसभेत (Lok Sabha) प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात, महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. नैतिकता समितीच्या चौकशीत त्या दोषी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, तीन राज्यांतील भाजपच्या विजयाने बॅकफूटवर गेलेल्या, इंडिया आघाडीला हा दुहेरी धक्का आहे का? तसेच, भाजपविरोधात इंडिया आघाडीची धार आणखी वाढणार का? या प्रश्नांनी जन्म घेतला आहे. वाचा सविस्तर...
Suraj Estate Developers IPO : भरघोस नफा कमावण्याची संधी! लवकरच येणार रिअस इस्टेट कंपनीचा आयपीओ, वाचा संपूर्ण माहिती
Suraj Estate Developers IPO News : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करण्याऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेअर बाजारात रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे. गुंतवणूकदारांनो, भरघोस नफा कमावण्याची ही संधी सोडू नका. सूरज एस्टेट डेवलपर्स कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. जर तुम्ही या आयपीओमध्ये पैसे लावण्याचा विचारात असाल तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या. वाचा सविस्तर...
Pet Dogs Ban : देशात पिटबुल आणि हिंस्र कुत्रे पाळण्याचे नियम काय? जाणून घ्या
Pet Dogs Rules in India : भारतात कुत्रे पाळण्याचे काय नियम आहेत आणि विशेषत: पिटबुलसारखे कुत्रे पाळण्यासंदर्भात काय नियम आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या. वाचा सविस्तर
Masterchef India Winner : ज्यूस सेंटर चालवणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक ठरला 'मास्टरशेफ इंडिया 8'चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये
Masterchef India 8 Finale Mohammed Ashiq Winner : 'मास्टरशेफ इंडिया 8' (Masterchef India 8) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नुकताच ग्रँड फिनाले फार पडला आहे. विकास खन्ना, रणवीर बरार आणि पुजा ढिंगरा यांनी या पर्वाचं परिक्षण केलं आहे. 16 ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम सुरू झाला होता. या पर्वात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुकिंग शैलीने जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 24 वर्षीय मोहम्मद आशिकने (Mohammed Ashiq) 'मास्टरशेफ इंडिया 8'च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मोहम्मद हा कर्नाटकातील मैंगलोर परिसरात राहणारा आहे. वाचा सविस्तर...
9 December In History : सोनिया गांधी, शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म, डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन; आज इतिहासात
मुंबई : आज म्हणजे 9 डिसेंबर रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट झालं होतं. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांचा तसेच खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Birthday) यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. तर सोलापुरात जन्मलेल्या डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस (Dwarkanath Shantaram Kotnis) यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती वाचा सविस्तर...
Horoscope Today 9 December 2023 : आजचा शनिवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 9 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 9 डिसेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, कर्क राशीच्या लोकांमध्ये आज आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, त्यांच्या स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा. तूळ राशीच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...