Suraj Estate Developers IPO News : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करण्याऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेअर बाजारात रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे. गुंतवणूकदारांनो, भरघोस नफा कमावण्याची ही संधी सोडू नका. सूरज एस्टेट डेवलपर्स कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. जर तुम्ही या आयपीओमध्ये पैसे लावण्याचा विचारात असाल तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.


पैसे कमावण्याची सुवर्णसंधी


अलीकडच्या काळात, टाटा टेक आणि आयआरईडीए सारख्या कंपन्यांनी आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. आता लवकर मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनीला आयपीओ बाजारात लाँच होणार आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनी लवकरच त्यांचा IPO लाँच करणार आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 18 डिसेंबर 2023 रोजी उघडणार आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनीला या IPO द्वारे 400 कोटी रुपये गोळा करायचे आहेत. IPO ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि ऑफर फॉर सेलद्वारे कोणतेही शेअर्स येणार नाहीत. 


तुम्ही IPO चे सबस्क्रिप्शन कधी घेऊ शकता?


सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा आयपीओ (IPO) 18 डिसेंबर 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. तुम्ही या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी 20 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. हा IPO 15 डिसेंबर 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. chittorgarh.com वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सचे वाटप 21 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप होणार नाही, त्यांना 22 डिसेंबरला परतावा मिळेल. आयपीओच्या यशस्वी गुंतवणूकदारांचे शेअर्स 22 डिसेंबर रोजी डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनी 26 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात येईल. या IPO मध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स, QIB साठी 50 टक्के आणि NII साठी 15 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. कंपनीने अद्याप IPO च्या प्राइस बँडची घोषणा केलेली नाही. 


आयपीओद्वारे उभारलेल्या पैशाचं कंपनी काय करणार?


IPO द्वारे उभारलेल्या रकमेपैकी 285 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. यापैकी 35 कोटी रुपये देऊन कंपनी मुंबईत जमीन खरेदी करणार आहे. उर्वरित रक्कम कंपनी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि ऑपरेशन्ससाठी वापरणार आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनीवर सप्टेंबर 2023 पर्यंत 568.83 कोटी रुपयांचे कर्ज आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 32.06 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. वार्षिक आधारावर 21 टक्के वाढ नोंदवली गेली. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 12.1 टक्क्यांनी वाढून 305.70 कोटी रुपये झाले आहे.