देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. IMD Weather Update : विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय, देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज


IMD Weather Update :  सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) पुन्हा आगमनाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोणकोणत्या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. वाचा सविस्तर 


2. G20 Summit India : G20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात दाखल होणार, महत्त्वांच्या विषयावर होणार चर्चा


G20 Summit India :  G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  (US President Joe Biden) आज भारतात दाखल होणार आहेत. ते अमेरिकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. बायडन यांची कोरोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं त्यांच्या येण्याबाबत स्पष्टता नव्हती.मात्र, त्यानंतरचे बायडन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बायडन G 20 साठी भारतात दाखल होत आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. वाचा सविस्तर 


3. UIDAI New Circular: मुदत वाढवली... आधार अपडेट करण्यासाठी आता 14 डिसेंबरपर्यंतची मुदत अन् पूर्णपणे मोफत


UIDAI New Circular: आधार कार्डधारकांना मोठा दिलासा देत, यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता ते मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आधार कार्ड (Aadhaar Card)  अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती, परंतु  ती 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा UIDAI नं ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर 


4. वेदांतासोबतचा करार तुटला, आता भारतात चिप्स बनवण्यासाठी फॉक्सकॉनसोबत नवा भागीदार; सरकारनं मागवला संपूर्ण अहवाल


Foxconn Finds New Partner To Build Chip Plant in India: तैवानची कंपनी फॉक्सकॉननं (Foxconn) यापूर्वी वेदांतासोबतचा (Vedanta) करार तोडण्याची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं फॉक्सकॉननं म्हटलं होतं. मात्र, हा करार तोडण्याबरोबरच फॉक्सकॉननं असंही म्हटलं होतं की, वेदांतासोबतचा करार तुटला असला तरी भारतात गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू बदललेला नाही. वाचा सविस्तर 


5. Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलला; धक्कादायक घटना आली समोर, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण


Covid-19 Treatment Effect: कोरोना (Coronavirus Effects) महामारीनं जवळपास सर्व जग आपल्या विळख्यात घेतलं होतं. कोरोनावर मात करत अनेकजण कोरोनामुक्त झाले, तर अनेकांनी आपले प्राणही गमावले. अशातच थायलंडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका लहान बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान, त्या बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलल्याचं लक्षात आलं. वाचा सविस्तर 


6. iPhone : iPhone यूजर्सला मिळेल पूर्वीपेक्षा चांगला अनुभव! iOS 17 चे टॉप फीचर्स, जाणून घ्या 


iPhone : Apple कंपनीने त्यांच्या वार्षिक कार्यक्रम WWDC 2023 मध्ये iOS 17 चे चे सॉफ्टवेअर वर्जन लॉन्च केले आहे. यामध्ये कंपनीने नवीन iOS मध्ये अनेक बदल केले असल्याचे सांगण्यात आले. या बदलांसह, iPhones मध्ये नवीन फिचर्ससोबत विविध अपग्रेड देखील करण्यात आले आहे, ज्यामुळे फोन, मेसेजेस आणि फेसटाइम अ‍ॅप्सचा इंटरफेस पूर्वीपेक्षा चांगला झाला आहे. खास iPhone यूजर्ससाठी iOS 17 च्या नवीन अपडेटेड फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात.. वाचा सविस्तर 


7. 8th September In History: भूपेन हजारिका, आशा भोसले यांचा जन्मदिन, अफगाणिस्तामध्ये रक्तपातानंतर रशियाची माघार आणि मालेगाव बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू


8th September In History : भारताच्या इतिहासासाठी आजचा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी अनेक दखल घेण्यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महान संगीतकार भूपेन हजारिका आणि गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिन. आपल्या आवाजाने हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन महान गायकांमध्ये केली जाते. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशाने हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. वाचा सविस्तर 


8. Horoscope Today 8 September 2023 : मेष, मिथुन, कुंभसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 8 September 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीचे लोक आज आपल्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील. तर, वृषभ राशीच्या लोकांना जोडीदाराचा पूर्ण सहकार्य मिळेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर