IMD Weather Update : सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) पुन्हा आगमनाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोणकोणत्या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
G-20 परिषदेदरम्यान दिल्लीतील हवामान कसे असेल?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर राजधानीत जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, आयएमडीने 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर, हवामान विभागाने दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 36-38 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 26-28 अंशांच्या दरम्यान राहणार आहे असे सांगितले आहे.
उत्तर प्रदेश-उत्तराखंडसह आज कुठे पाऊस पडणार ?
उत्तर प्रदेशातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी (8 सप्टेंबर रोजी) पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडला. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.
याबरोबरच आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील डेहराडूनसह पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डेहराडून, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनितालमध्ये हवामानशास्त्राकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD नुसार, टिहरी, पौरी आणि चंपावतच्या काही भागांत हलका पाऊसही पडू शकतो.
पावसामुळे नागरिकांना दिलासा
राजस्थानमध्ये बराच वेळ पाऊस न पडल्याने येथील हवामानातही बदल झाला आहे. जयपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, मध्य प्रदेशातही पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील सुमारे 30 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.
मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :