देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील   


मुंबईतल्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी, आगीचं कारण अस्पष्ट 


मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत  सात जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर 51  जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर) 


सुप्रीम कोर्टातली ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी चौथ्यांदा लांबली,  आता 3 नोव्हेंबरला सुनावणी 


सुप्रीम कोर्टातली ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी महिन्याभरानं लांबली आहे. सुनावणी चौथ्यांदा लांबली असून  सुप्रीम कोर्टात पुढची तारीख ३ नोव्हेंबरला होणार आहे. (वाचा सविस्तर)


सिक्कीममध्ये महापुराचा हाहाकार, 18 जणांचा मृत्यू, 98 बेपत्ता, 48 तासांपासून लोक बोगद्यात अडकले 


क ढगफुटी झाल्याने सिक्कीममध्ये भीषण पूर आला. ज्यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 98 लोक बेपत्ता आहेत. राज्य सरकारने बुधवारी (4 ऑक्टोबर) केंद्र सरकारला याची माहिती दिली. (वाचा सविस्तर)


 रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बरसले,"हल्ला मुद्दाम केला" 


 रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 500 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी (5 ऑक्टोबर) रशियन सैन्याने ईशान्य युक्रेनमधील ह्रोझा गावावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला होता. एका मृत युक्रेनियन सैनिकाच्या शोक सभेदरम्यान शेकडो लोक उपस्थित असताना रशियाकडून हा हल्ला करण्यात आला. (वाचा सविस्तर)


 'ते एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती..' रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक!


 रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत (PM Modi) आमचे खूप चांगले राजकीय संबंध आहेत. ते एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. भारत आणि रशिया हे दोन्ही देश विकासाच्या अजेंड्यावर पूर्णपणे जुळलेले आहेत (वाचा सविस्तर)


 सुपरस्टार विनोद खन्ना यांचा जन्म, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अन्वर सादत यांची हत्या; आज इतिहासात


आजचा दिवस जगाच्या आणि देशाच्या इतिहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जच्या दिवशी इजिप्तचे (Egypt) राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अन्वर सादत यांची अरब कट्ट्ररवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) कायद्याला देखील मंजूरी देण्यात आली होती. आजच्याच दिवशी जगातला पहिला बोलपट हा अमेरिकेत प्रदर्शित करण्यात आला होता.सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना यांचा आजच्याच दिवशी जन्म म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी जन्म झाला होता. जाणून घ्या आजचा दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे.   (वाचा सविस्तर) 


आजचा शुक्रवार महत्त्वाचा, 'या' राशीच्या लोकांनी बोलताना नियंत्रण ठेवा, आजचे राशीभविष्य


ज्योतिषशास्त्रानुसार आज 06 ऑक्टोबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीचे लोक आज चांगली स्थिती प्राप्त करू शकतील.; वृश्चिक राशीच्या लोकांचा प्रवास होऊ शकतो. इतर राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.  (वाचा सविस्तर)


 टीम इंडियाला मोठा झटका, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण? 


भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र अद्याप अंतिम वैद्यकीय अहवाल आला नाही. तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. (वाचा सविस्तर)