Vladimir Putin On India : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत (PM Modi) आमचे खूप चांगले राजकीय संबंध आहेत. ते एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. भारत आणि रशिया हे दोन्ही देश विकासाच्या अजेंड्यावर पूर्णपणे जुळलेले आहेत.


 


मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ते अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे, ते म्हणाले की, भारताचे नेतृत्व मजबूत आहे आणि राष्ट्रीय हितांना प्राधान्य देते. पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यात आर्थिक सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या लढ्यात आणखी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.


 


पंतप्रधान मोदींसोबत खूप चांगले राजकीय संबंध
मीडिया चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओनुसार, एका कार्यक्रमादरम्यान पुतिन म्हणाले की, आमचे पंतप्रधान मोदींसोबत खूप चांगले राजकीय संबंध आहेत. ते एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. भारत आणि रशिया हे दोन्ही देश विकासाच्या अजेंड्यावर पूर्णपणे जुळलेले आहेत.नवी दिल्लीत झालेल्या G20 कार्यक्रमात युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षासाठी शांततेचे आवाहन करण्यात आले होते, परंतु यासाठी भारताकडून संपूर्ण दोष रशियावर टाकण्यात आला नाही. असेही ते म्हणाले. गेल्या महिन्यात देखील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ते योग्य काम करत असल्याचे म्हटले होते. आठव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) येथे पुतीन म्हणाले की, ते सध्या भारतीय बनावटीच्या वाहनांच्या निर्मितीवर आणि वापरावर लक्ष केंद्रित करत आहेत, मला वाटते की मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी योग्य काम करत आहेत.



भारतीय नेतृत्व मजबूत
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाची राजधानी मॉस्को येथे एका कार्यक्रमात बोलताना पुतिन यांनी पाश्चात्य देशांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारत, चीन आणि अरेबियासारखे देश पाश्चात्य देशांचे अनुकरण करत नाही. तर ते या देशांना एक शत्रुच्या रुपात पाहतात. पुतिन म्हणाले, "एकेकाळी त्यांनी भारतासोबत असेच करण्याचा प्रयत्न केला. आशियातील परिस्थितीही आपण चांगल्याप्रकारे समजून घेतो. भारतीय नेतृत्व मजबूत आहे आणि आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देते. अशा परिस्थितीत त्यांचे (पाश्‍चिमात्य देशांचे) असे प्रयत्न व्यर्थ आहेत, असे मला वाटते. असे पुतीन यावेळी म्हणाले.



सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागाचे समर्थन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताच्या मोठ्या सहभागाचे समर्थन केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकासारखे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अधिक प्रतिनिधित्वास पात्र आहेत. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात सुधारणा झाली पाहिजे. कायम सदस्यत्व मिळावे.



भारत शक्तिशाली देश
रशियास्थित आरटी न्यूजच्या वृत्तानुसार, पुतिन यांनी भारताला एक शक्तिशाली देश म्हटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तो मजबूत होत असल्याचे सांगितले. पुतिन म्हणाले, "भारत हा सव्वा अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेला, 7 टक्क्यांहून अधिक आर्थिक वाढ असलेला शक्तिशाली देश आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तो मजबूत होत आहे." आरटी न्यूजच्या वृत्तानुसार, याआधी बुधवारी पुतिन यांनी पीएम मोदींचे एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून वर्णन केले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासात खूप प्रगती करत असल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यातही त्यांनी पीएम मोदींचे कौतुक केले होते आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम मोदी चांगले काम करत असल्याचे म्हटले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Romanian Dictator: दिवसातून 20 वेळा दारुने हात धुवायचा 'हा' हुकुमशहा; लोकांमध्ये होती दहशत