देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : कुठे पाऊस तर, कुठे बर्फवृष्टी! आज देशात हवामान कसं असेल? IMD चा अंदाज काय सांगतो, वाचा
Weather Update Today : आज देशात काही भागात पाऊस (Rain) तर काही ठिकाणी बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळेल. भारतीय हवामान खात्याने (IMD) ताज्या हवामान अंदाजात म्हटलं आहे की, आज पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी, वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या परिसरातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेशात गडगडाटी वादळी वारा आणि हिमवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे. वाचा सविस्तर...
मुस्लिम देशात पहिले हिंदू मंदिर, मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन; पाहा मंदिराची पहिली झलक
UAE Hindu Temple : पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील (UAE) अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराच (Hindu Temple) उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधल आहे. अबुधाबी येथून 40 किलोमीटर, तर दुबई येथून 105 किलोमीटरवर हे मंदिर आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याची काही दृश्य 'एबीपी माझा'च्या हाती आली आहेत. वाचा सविस्तर...
Nashik IT Raid : सोन्याची बिस्किटं, दागिने, रोख रक्कम आणि बरंच काही..! नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा, कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत
Nashik News : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 850 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाचा सविस्तर...
Crime News : एका 'नो बॉल'मुळे आयुष्य संपलं; खेळाडूला जबर मारहाण, दुर्दैवी अंत
Clash During Cricket Match Near Noida: नवी दिल्ली : क्रिकेट सामना (Cricket Match) सुरू होता, तेवढ्यात खेळता खेळता वाद झाला. वादाचं रुपांतर भांडणात झालं आणि पुढे जे झालं ते खरंच फार भयावह होतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामध्ये (Noida) क्रिकेट खेळताना झालेल्या वादामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान वाद झाला आणि याच वादातून तिघांनी एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या केली. वाचा सविस्तर...
Horoscope Today 5 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 5 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार नोकरीत प्रगतीसाठी वृषभ राशीच्या लोकांसाठी स्वच्छ प्रतिमा असणे अत्यंत आवश्यक आहे. आज सिंह राशीच्या लोकांनी आपल्या व्यावसायिकांवर विश्वास ठेवावा.. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...