Nashik News : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 850 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.


कधी कर्मचाऱ्यांच्या घरी... काहींच्या कार मधून रोकड जप्त


आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये धडकल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.  शहरातील सर्वांत मोठ्या शासकीय कंत्राटदाराची सात लाख निवासस्थाने आणि कार्यालये अशा तब्बल चाळीस ठिकाणी एकाच वेळी धडकले. त्याने त्या ठिकाणाहून ताबाच घेतला. संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली. आयकर विभागाच्या छापामारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत, काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी तर काहींच्या कार मधून रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पुढील तपासात आणखी काय बाहेर येते? याकडं लक्ष लागलं आहे.


 



गेल्यावर्षी जीएसटीकडून मोठे धाडसत्र


गेल्यावर्षी देखील नाशिक शहरात जीएसटी विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविले होते. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांची पाच ते सहा तास चौकशी झाली होती. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले आणि सध्या मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरात कार्यरत असलेले अधिकारी रडारवर होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे. 


 


आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये, चर्चेचा विषय


पुन्हा एकदा महसूल आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये धडकल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.  बुधवारी सकाळी शहरातील सर्वांत मोठ्या शासकीय कंत्राटदाराची सात लाख निवासस्थाने आणि कार्यालये अशा तब्बल चाळीस ठिकाणी एकाच वेळी धडकले. त्याने त्या ठिकाणाहून ताबाच घेतला. संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली.


 


 


हे ही वाचा>>


मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती