देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देशाच्या 'या' भागांत मान्सूनचे पुनरागमन; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
अनेक दिवसांच्या विश्रातीनंतर महाराष्ट्रासह देशभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. या वर्षी, देशात 1901 नंतर ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. आता पुन्हा एकदा दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय होण्याचे संकेत हवामान विगागाने दिले आहेत (वाचा सविस्तर)
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा उपोषणकर्त्यांवर काल पोलिसांकडून लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार, 25 पोलीस तसेच 80 ते 90 आंदोलक जखमी
जालन्यात पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झालाय. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मात्र उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर तिथं दगडफेक झाली. पुढे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. हे कमी म्हणून की काय हवेत गोळीबारही केला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय. (वाचा सविस्तर)
आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार, भारताच्या मोहिमेकडं जगाचं लक्ष
चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 ) हे आज (2 सप्टेंबर) सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. (वाचा सविस्तर)
'मेरी माटी-मेरा देश' हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग : अमित शाह
'मेरी माटी-मेरा देश' (Meri Maati Mera Desh) हा केवळ एक कार्यक्रम नसून, देशाच्या भवितव्याशी स्वतःला जोडण्याचे माध्यम असल्याचे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Minister Amit shah) यांनी व्यक्त केलं. तसेच हा कार्यक्रम म्हणजे देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेला प्रारंभ करण्यात आला. (वाचा सविस्तर)
वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानांवरील पाट्या मराठी करा; सुप्रीम कोर्टाचा किरकोळ व्यापाऱ्यांना सल्ला
दुकानांच्या पाट्यांवरील नावे आणि माहिती मराठीत लिहिण्याविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेणाऱ्या मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांना कोर्टाने सल्ला दिला आहे. वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानदारांनी मराठीमध्ये पाट्या कराव्यात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. (वाचा सविस्तर)
गुजरात जिंकल्यानंतर अकबराने बुलंद दरवाजा बांधला, बुला चौधरीचा विक्रम आणि जगातले पहिले ATM सुरू; आज इतिहासात
बँकिग क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या जगातल्या पहिल्या एटीएमची सुरूवात आजच्याच दिवशी झाली. न्यूयॉर्कमधील केमिकल बँकेने पहिले एटीएम बाजारात आणले. भारताच्या इतिहासात आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली. गुजरात विजयाच्या स्मरणार्थ मुघल सम्राट अकबरने आजच्याच दिवशी फत्तेपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजाची निर्मिती केली. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 2 सप्टेंबर या तारखेला घडलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे. (वाचा सविस्तर)
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, कॅनरा बँकेची 538 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal ED Arrested) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने अटक केली आहे. कॅनरा बँकेची (Canara Bank) 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
(वाचा सविस्तर)
चंद्रावर जमीन खरेदीला सुरुवात! एका एकरसाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे; नेमकी प्रक्रिया काय?
चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशानंतर संपूर्ण देशाला सुखद धक्का बसला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही अवघड कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आणि जगभरातून भारताचं कौतुक झालं. आता या क्षणानंतर अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी (Resgister land on moon) करण्यास सुरुवात केली आहे. भारताने चंद्रावर चांद्रयान 3 उतरवल्यापासून भारतीय लोकांमध्ये चंद्राविषयीची क्रेझ वाढली आहे. (वाचा सविस्तर)
वृषभ, मिथुन, तूळसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांनी सावध राहण्याचा दिवस आहे. आज तुमचे विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तर, कर्क राशीच्या लोकांनी मानसिक शांतीसाठी गोड वस्तूंचे दान करणं गरजेचं आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल?
(वाचा सविस्तर)