Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार

Jalna Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Sep 2023 08:40 PM
Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश

जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत. 

Jalna : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार- सूत्र 


अजित पवार गटाची मराठा आरक्षण मिळावी हीच भूमिका असल्याची आमदारांची एबीपी माझाला माहिती. 


अजित पवार आमदारांसह आजच आंदोलन स्थळी जाऊन भेट घेणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी आजची भेट टाळली- सूत्र


उपमुख्यमंत्री अजित पवार आंदोलकांच्या संपर्कात असून लवकरच आंदोलन स्थळी जाऊन भेट देखील घेणार.

Indapur News : जालन्यातील घटनेचे पडसाद, इंदापूरमध्ये रास्तारोको आंदोलन

इंदापूर : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कृतीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी राज्यात उमटत असून इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन करत लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पुणे सोलापूर महामार्ग आंदोलकांनी अडवून धरत घटनेचा निषेध केला. आंदोलकांनी जवळपास 10 ते 15 पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकानी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Pimpari News : जालना लाठीचार्जचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले, 'त्या' भागातील एसटी रद्द

पिंपरी-चिंचवड : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. या आंदोलनाचा मोठा फटका हा राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे पिंपरी-चिंचवड आगारातून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाऱ्या 100 पेक्षा अधिक बस रद्द झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर महामंडळाचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

जालना लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्रालयाची कारवाई

जालन्यातील घटनेमध्ये अनेक पोलीस देखील जखमी झाले असून गृहमंत्रालयाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.  पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात दाखल

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त कार्यक्रम स्थळी करण्यात आला आहे. 

सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक

सोलापुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आले. पण या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

बुलढाण्यात मविआकडून रास्ता रोको

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 6 वर रास्ता रोको केलं. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

दादरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन

मुंबईतील दादर परिसरात मराठा समाजाकडून जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. 

पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द

पुण्यातील मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. 

सोलापुरात आज सकल मराठा समाजतर्फे सर्व तालुक्यात रास्ता रोकोची हाक

सोलापुरात आज सकल मराठा समाजतर्फे जिल्ह्यात सर्व तालुक्यात रास्ता रोकोची हाक


सकाळपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाठिकाणी रास्ता रोको करण्यास सुरुवात


बार्शीतील पानगाव येथे मराठा समजतर्फे रास्ता रोको


मराठा समाज बांधवानी सोलापूर - बार्शी रास्ता रोखला


काही वेळात सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग देखील मराठा समाज बांधव रोखणार


सोलापुरातील मार्केट समोर मराठा समाज बांधव एकत्रित जमले असून काही वेळात सुरु होणार रास्ता रोको

राज ठाकरेंचा फोनवरुन आंदोलकांशी संवाद

मनसे नेते बाळा नांदगावकर हे अंतरवालीमध्ये दाखल झाले असून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन लावला. राज ठाकरे यांनी फोनवरुन या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर अंतरवाली सराटीमध्ये दाखल, आंदोलकांची घेतली भेट

Jalna : मनसे नेते बाळा नांदगावकर अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. यानंतर बाळा नांंदगावकर हे रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांशी चर्चा देखील करणार आहेत.

बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Buldhana : बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कार्यक्रम ठिकाणची पाहणी.जालना येथील घटनेच्या नंतर राज्यभरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. तसेच आज मराठा संघटना आणि महाविकास आघाडीने बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्याचा इशाराही दिला आहे. जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी झाली असून आज सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री बुलढाण्यात दाखल होणार आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त बुलढाणा शहरात लावला आहे...

बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन

जालना येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान जळगाव जामोद, नांदुरा, बुऱ्हानपूर मार्गावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजल्पायासून रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या तीन तासापासून या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं आहे.या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे.

विजय वडेट्टीवारांसह बाळा नांदगावकर आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार, आंदोलकांची घेणार भेट

जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशीही आंदोलनस्थळी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर आज अंतरवाली सराटी या गावांमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. अंबड येथील रुग्णालयातील जखमी आंदोलकांची विचारपूस देखील करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर हे थोड्याच वेळात छत्रपती संभाजी नगरमधून जालनाच्या दिशेने रवाना होतील. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगर येथून आंदोलनस्थळी भेट देऊन, त्यानंतर जखमींची विचारपूस करणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चा नाशिक आणि सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व समाज बांधवांनी सकाळी ठीक 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, नाशिक येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वप्रथम रॅली काढून स्वय:स्पूर्तीनं नाशिकमधील सर्व व्यावसायिक,उद्योजक, इतर संस्था यांना बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिक व समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा ही नम्र विनंती.


 

11 वाजता मुंबईतील दादर प्लाझा येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन 

जालनामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील दादर प्लाझा येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात निदर्शन आंदोलन 


अनेक मराठा कार्यकर्ते आणि मराठा क्रांती मोर्चा चे प्रमुख नेते उपस्थित राहणार...


प्लाझा सिनेमासमोर होणार निदर्शने


 

जालन्याच्या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात आजही ST बससेवा बंद

 एसटी बस सेवा आजही बंद 


Nanded : जालना जिल्ह्यातील घटनेनंतर हिंसक आंदोलन सुरू झाल्याने काल एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. आज देखील नांदेड जिल्ह्यात एसटी बसेस बंद आहेत .. जिल्ह्यांतील सर्वच आगारात बसेस बंद आहेत ... आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता असल्याने बस सेवा बंद ठेवण्यात आली ... बसेस बंद असल्याने प्रवाश्याची गैरसोय होत आहे ... पोलीसांच्या सूचने नुसार बस सेवा सुरू केली जाणार असल्याने महामंडळाकडून सांगण्यात आले 

जालन्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गटाचे आंदोलन

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गटाचे आंदोलन. 


आंदोलनाच्या माहिती मिळतच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांना घेतला ताब्यात


 मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गट व मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांकडून आंदोलन.


ठाकरे गट आणि पोलीसांमध्ये बाचाबाची, आंदोलन करू नका पोलिसांचं म्हणणं


आंदोलन करायला देत नसल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

जालना : जालना शहरात राडा करणाऱ्या 200 ते 250 जणांवर गुन्हे; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाला होता वाद

जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलिसांनी आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे पर्यावरण दगडफेकीमध्ये झालं होतं यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत 200 ते 250 गुन्हे दाखल केलेत, अंबड चौफुली भागात  ट्रक जाळून चालक असलेला फिर्यादी आणि क्लिनर ला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 200 ते 250 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

जालना : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतरवली सराटी गावात दाखल, आंदोलनकर्त्यांची घेणार भेट

जालना : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतरवली सराटी गावात दाखल, आंदोलनकर्त्यांची घेणार भेट

औरंगाबाद: सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहरात बंद पाळला जाणार; मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निर्णय

औरंगाबाद:  जालनामध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात सोमवारी छत्रपती संभाजी नगर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आज झालेल्या बैठकीत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. 

जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंडेवादी जवळ आंदोलक आणि पोलीस आमनेसामने; दोन्ही बाजूने दगडफेक

जालना:  जालना शहरातील इंदेवाडी भागामध्ये पोलीस आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या आंदोलकांमध्ये अजून तणावाची स्थिती आहे.  पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आल्यानंतर दोन्ही  बाजूंकडून दगडफेकीची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंडेवादी जवळ ही घटना घडली. 

लाठीचार्जनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याची जबाबदारी ही पोलीस कारवाईचा निर्णय घेणाऱ्यांची आहे: शरद पवार

जालना : आंदोलकांसोबत चर्चा सुरू असताना एकदम लाठी हल्ला केला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला (बळाचा वापर करण्याचा) त्यांची आहे: शरद पवार

जालना : आंदोलन शांततेने व्हावे, कायदा हातात घेण्याचे काम कोणी करू नये, शरद पवारांचे आवाहन 

जालना : आंदोलन शांततेने व्हावे, कायदा हातात घेण्याचे काम कोणी करू नये, शरद पवारांचे आवाहन 

चर्चेतून मार्ग निघत असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांकडून बळाचा वापर झाला; शरद पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप

जालना: आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला; शरद पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप

जालना: सराटीमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे; शरद पवारांचे पत्रकार परिषदेत वक्तव्य

जालना: सराटीमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. ही घटना जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही; शरद पवार 

हिंगोली: वसमत तालुक्यत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संभाजी ब्रिगेडने दाखवले काळे झेंडे; जालनामधील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध

हिंगोली: वसमत तालुक्यत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संभाजी ब्रिगेडने दाखवले काळे झेंडे; जालनामधील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध


सुधीर मुनगंटीवार आवड्याहून नांदेडच्या दिशेने जात असताना वसमत तालुक्यातील जिंतूर टी पॉईंट जवळ आल्यानंतर काळे झेंडे दाखवले

 

 

 

 

शरद पवार यांनी घेतली जखमी आंदोलकांची भेट

Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे जालन्यात दाखल झाले आहेत. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मराठा आंदोलकांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार जालन्यात दाखल, जखमी आंदोलकांची घेणार भेट

Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे जालन्यात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते जखमी मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. 

मराठा आरक्षण चिघळल्यानंतर जालन्यात होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला

जालन्यात होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला आहे. मराठा आरक्षण चिघळल्यानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. 16 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. 

जालन्यात मराठा बांधवांवर झालेल्या घटनेचा नांदगाव निषेध...

जालना येथील मराठा बांधवांवर अमानुष मारहाण झालेल्या घटनेचा नांदगाव निषेध...
- शासनाचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी ( दि.७ ) रास्ता - रोको आंदोलन करणार...
- सकल मराठा समाज,नांदगावने घेतलेला निर्णय...
- लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा : मराठा समाजाची मागणी..
- मराठा समाजाच्या भविष्यासाठी संघटित व्हा ;  मराठा समाजाला आरक्षण मिळावे...
- सकल मराठा समाज बैठकीत मागणी...
- विविध पक्ष संघटनेचे नेते व कार्यकर्ते मराठा समाज म्हणून एकत्र...

पोलीसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला ? उद्धव ठाकरेंचा सवाल 

Uddhav Thackeray : 


आज संध्याकाळी मी जालना जातोय


नुसता निषेध करून चालणार नाही
सरकार वर ताशेरे न्यायालयाने मारले आहेत
राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे


आपली बैठक सुरू असताना एकाने पत्रकार परिषद घेतली


1 फुल 2 हाफ मधला एकही आंदोलन उपोषण सुरू आहे तिकडे गेले नाही


आम्हला चिंद्या म्हणाले आणि त्या मिद्यांच्या चिंद्या झालंय ठिगळ लावून सरकार चालताय त्याच आधी बघा


1 फुल दोन हाफ जालन्याला काय गेला नाही ?


पोलीसांनाआदेश कोणी दिला ? 


सरकार आपल्या दारी, थापा मारताय लय भारी हे आता हिंगोलीत त्यांना घ्यायचं आहे


चौकशी करून तुम्ही काय करणार, नुसत्या चौकश्या लावल्या जाताय


आरक्षण प्रत्येक समाजासाठी महत्वचा आहे

मराठा आंदोलनकांवर लाठीचार्ज झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : पंकजा मुंडे
मराठा आंदोलनकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांन केली आहे. 



कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; आंदोलकांची मागणी
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे...अहमदनगरच्या कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आलीये...सकाळ पासूनच कर्जत शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अचानक आणि रस्ता रोको करण्यात आला दरम्यान या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेऊन राजाच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. 
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मोर्चा, महिला पदाधिकाऱ्यांची दुकानावर दगडफेक 




धाराशिव शहरात दगडफेकीची घटना

 

जालना येथील घटनेचा निषेधार्थ मोर्चा काढताना धाराशिव शहरात दगडफेकीची घटना घडली. यानंतर शांतता राखण्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवाहन केलं आहे. महिला पदाधिकाऱ्यांची   दुकानावर दगडफेक 
 

 


 



 



 
जालन्यातील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, अमोल मिटकरी यांची मागणी

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सरकारकडे केलीयं. 

लातूर बंदचा एस टी वर मोठा परिणाम, 522 बसच्या 2700 फेऱ्या बंद

अंतरावली, जालना येथे मराठा समजावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ लातूर बंद चे आव्हान करण्यात आले होते. त्यास जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.आज लातूर शहरातील सर्व बाजारपेठ 100 टक्के बंद आहे. काल जहिराबाद रस्त्यावर टायर जाळत वाहतूक बंद करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती ..यामुळे लातूर एस टी महामंडळने खबरदारी म्हणून जवळपास सर्वच फेऱ्या बंद केल्या आहेत.लातूर बंदचा एस टी वर मोठा परिणाम झाला आहे. 522 बसच्या 2700 फेऱ्या बंद केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बस सुरू आहेत. मात्र त्या लातूर येथून मार्गस्थ होत नाहीत तर बाहेरून येणाऱ्या बस आहेत. जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू आहेत त्याची संख्याही त्रुळकच आहे..अनेक प्रवासी लातूर औसा अहमदपूर उदगीर सारख्या बस स्थानकात अडकून पडले आहेत. 

जालन्यातील घटनेचा बारामतीत निषेध, सोमवारी बारामती बंदची हाक

Baramati News : जालना येथे मराठा बांधावावर झालेल्या हल्ल्याचा आज बारामतीत निषेध करण्यात आला. बारामतीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बारामतीतील प्रशासकीय इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. तसेच ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांना तात्काळ निलंबन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.. तसेच सोमवारी बारामती बंदची हाक आंदोकांनी दिली आहे. तसेच सोमवारी जालना येथील घटनेच्या निषेधार्थ बारामतीत मूक मोर्चा देखील काढला जाणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.


 
लाठीहल्ल्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची, फडणवीसांनी राजीनामा द्यावा: रोहित पवार






जालना घटनेत कोणाच्या आदेशावर हा लाठी हल्ला करण्यात आला याची चौकशी व्हायला पाहिजे. गृहमंत्री सांगत नाहीत तोपर्यंत लाठीहल्ला केला जात नाही. या लाठी हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्री यांची आहे, त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलीय. आम्ही या घटनेचा निषेध करतो.


 

 



 



 




 


शरद पवार यांचे छत्रपती संभाजीनगर आगमन, थोड्याच वेळात जालन्याच्या दिशेनं रवाना होणार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे छत्रपती संभाजीनगर आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ते जालन्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासोबत आहेत. 

पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे खरे सूत्रधार फडणवीसच, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

मराठा आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे खरे सूत्रधार फडणवीसच! अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप!



जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलक मराठ्यांना  अमानुष मारहाण व लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.व पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला रोखण्यात राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याने किंबहुना या मागील सूत्रधार फडणवीसच असल्याने त्यांची  मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आहेत.ते मुख्यमंत्री असताना हा अन्याय, अत्याचार होतोच कसा? अशी हिम्मत पोलीस खाते करतेच कसे? या हिंसाचाराची कल्पना गृह मंत्र्यांना न्हवती का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून पुरुष आंदोलकांसोबत महिला व लहान मुलांवर लाठीलार्ज झाला हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला तडा देणारे कृत्य आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याठी राज्यात काही शक्ती कायम कार्यरत आहेत. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला आव्हान देणारे कुणाचे समर्थक आहेत हे जगाला माहिती आहे.या सर्व प्रकाराला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. असेही जगताप यांनी म्हंटले आहे.

मनोज जरांगे उपोषणावर ठाम, आरक्षण मिळेपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार

कालच्या घटनेनंतर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आजही आंदोलन सुरु आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. काल रात्री 11 वाजता ते पुन्हा उपोषणस्थळी येऊन बसलेत. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार त्यांनी केलाय. 

माजलगावमध्ये मराठा आंदोलकांची पोलिसाच्या दिशेने दगडफेक..

माजलगाव मध्ये मराठा आंदोलकांची पोलिसाच्या दिशेने दगडफेक..


संतप्त जमवणे दुकान आणि गाड्यावरही दगडफेक केली..


जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज विरोधात बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे माजलगाव मध्ये देखील मराठा समाज बांधवांकडून शहर बंदीची हाक देण्यात आली होती मात्र यावेळी याबद्दल लागला असून संतप्त जमावाने संभाजी महाराज चौकातील एका हॉटेलवर तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे.. जालना जिल्ह्यातल्या सराटे अंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज याचा निषेध करण्यासाठी माजलगाव शहरांमध्ये मराठा बांधवांनी रॅली काढली होती आणि याच रॅली दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकात एक हॉटेल उघडे असल्याने संतप्त जमावाने या हॉटेलवर तुफान दगडफेक केली आहे.. संतप्त जमावाने पोलिसाच्या दिशेने दगडफेक केल्याने पोलिसांना अक्षरशः पळ काढावा लागला..


मराठा बांधवांनी काढलेल्या रॅलीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता त्यामुळे काही वेळातच पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली असून सध्या माजलगाव शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे



गंगापूर-लासूर महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून टायर जाळून निषेध

गंगापूर-लासूर स्टेशन राज्य महामार्ग 39 शेकटा फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून टायर जाळून मराठा बांधवावर लाठीचार्ज निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलं. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी रास्ता रोको करत बराच वेळ आंदोलकांनी रास्ता रोको केला.

जालन्याची घटनेची चौकशी झाली पाहिजे : आमदार शिवेंद्रराजे भोसले

जालन्याची घटनेचा निषेध. या घटनेची चौकशी झाली पाहिजेत असे वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं.  
पोलिसांची चुक असेल तर त्यांच्यावर कारवाई करा
यात राजकारण आणून देवेंद्र फडणविस यांच्यावर आरोप केला जात आहे
विरोधकांचे ते कामच आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना जिल्हा दौरा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना जिल्हा दौरा.


5.55 छत्रपती संभाजीनगर हुन जालनासाठी रवाना. 


7.00 आंतरवाली सराटी ,गावकरी भेट.


7.25 अंबड कडे रवाना 


7.50 अंबड शासकीय रुग्णालयात आंदोलक भेट 


8.15 छत्रपती संभाजीनगर कडे 


9.00 छत्रपती संभाजीनगर

बुलढाण्यातील देऊळगावमध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको

देऊळगावमही मध्ये मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने केला रास्तारोको...


मलकापूर - सोलापूर - इंदोर मार्ग रोखला... गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा केली मागणी..


जालना जिल्ह्यातील अंतरावली गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ सकल  मराठा समाजाच्या वतीने  मलकापूर - सोलापूर राज्य मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.. 
यावेळी आंदोलनकांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काल राजिनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली..

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालन्याला जाणार, आंदोलकांची भेट घेणार

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी आंतरवाली सराटी गावला भेट देणार आहेत. तेथील आंदोलकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर अंबड शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत. 

मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षातर्फे नवी मुंबईत निषेध आंदोलन


जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराचा नवी मुंबईत निषेध.


मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षातर्फे नवी मुंबईत निषेध आंदोलन.


मराठा क्रांती मोर्चा तर्फे घटनास्थळी जाणाऱ्या शरद पवार, अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका.


शरद पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही.


मराठा समाजाचा पहिला घात शरद पवार यांनी केलाय.


शरद पवार घटनास्थळी येणार असतील तर त्यांचा विरोध करण्यासाठी मराठा समाज देखील तिथे येईल.


मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अंकुश कदम यांचा इशारा.

जालन्यातील घटनेनंतर सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी ST पूर्णपणे बंद

सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद


जालना येथील घटनेनंतर एसटी बसेसवर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनानंतर खबरदारी 


 राज्य परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागातील मराठवाडा कडे जाणाऱ्या 54 फेऱ्या सकाळपासून रद्द 


इतर भागात मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक सुरळीत सुरू


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांची माहिती


 

मराठा आंदोलकांवरच्या हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण 


Prithviraj Chavan : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा  निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.



यापुढे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.


मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांच्यावर आज झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत आहोत.

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेला नंदुरबार बंद घेतला मागे, बस सेवा मात्र बंद

Nandurbar :  जालना येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेला नंदुरबार बंद संघटनांनी घेतला मागे...


मात्र सुरक्षिततेच्या कारणामुळे जिल्ह्यातील बस सेवा करण्यात आली बंद....


बसेसचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळाचा निर्णय प्रवाशांचे हाल


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात....

संभाजीराजे छत्रपती आंदोलकांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल

Sambhajiraje Chhatrapati : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती जालन्यात दाखल झाले आहेत. 

विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही : नितेश राणे

विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही : नितेश राणे


काल रात्री छत्रपती संभाजीनगरला कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या ?? 
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते..
मग हीच ती दंगल होती का? 
यांची चौकशी झाली पाहीजे !!
मराठा आरक्षण हे राणे समितीच्या अहवाला मुळे भेटलं..
आणि ते आरक्षण फडणवीस साहेबांनी टिकवून दाखवलं..
पण विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही..
सत्तेत असताना यांनी आरक्षणाच्या केस ची वाट लावली..
समाजाला ही माहीत आहे, आरक्षण परत आमचेच सरकार देणार..
शांत आंदोलन होत असताना पोलिसांवर दगड कोणी मारायला लावली ? 
माविआच्या नेत्यांची खरी चिंता मराठा आरक्षण पेक्षा राज्यात निघणाऱ्या “हिंदू जनआक्रोश मोर्चाची” आहे..
हिंदू समाजाला आपसात लढवत ठेवायचे!!
मराठा समाजाच्या माझ्या बांधवानी हा डाव वेळीच ओळखावा.. हीच विनंती !

गृह विभागाच्या आदेशाशिवाय हा लाठीमार होत नसतो : रोहित पवार

Rohit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील 8 तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केलाय. दरम्यान गृह विभागाच्या आदेशाशिवाय हा लाठीमार होत नसतो म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष पणे ग्रहमंत्र्यावर टीका केलीय. रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजता समनव्यक मनोज जरांगे यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.

मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत तातडीची बैठक

Maratha Protest : अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची तातडीची बैठक आज दुपारी चार वाजता शिवनेरी , शिवाजी मंदिर , दादर आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती.

पोलिसांनी विश्वासात घेऊन विषय संपवायला हवा होता : राजेश टोपे

Rajesh Tope : पोलिसांनी विश्वासात घेऊन विषय संपवायला हवा होता असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राजेश टोपे बोलत होते. या घटनेमागे घातपात वाटत नाही पण समन्वयाचा अभाव आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा असे टोपे म्हणाले. मराठा क्रांती मोर्चे लाखोंच्या संख्येनं काढले पण गालबोट लागलं नाही मग आता संयम राखा.

Sharad Pawar : शरद पवार आज जालना दौऱ्यावर, जखमी आंदोलकांची घेणार भेट

Jalna Maratha Reservation Protest : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये उपोषण करत असलेल्या मराठा  आंदोलकांवर (Jalna Maratha Reservation Protest) पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी  गावाला भेट देणार आहेत. तसेच अंबड रुग्णालय भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. 

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध : माकप

Maratha Protest : जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या अमानुष कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने  तीव्र शब्दात निषेध केला आहे. देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे आणि विरोध करणारांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देणारे आहे. राज्य सरकारचा हा दृष्टिकोन अत्यंत निषेधार्ह असल्याची टीका पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे. 

जालना मराठा आंदोलन लाठीमार प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जालना दौऱ्यावर, आंदोलकांची घेणार भेट

जालना मराठा आंदोलन लाठीमार प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जालना दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते अंतरवाली सराटी गावी जाणार असून जखमी आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

जालनात लाठीमार; मराठा क्रांती मोर्चा मुंबईत उद्या तातडीची बैठक

Mumbai : अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या  सरकारचा निषेध करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची तातडीची बैठक उद्या दिनांक 2 सप्टेेंबर रोजी दुपारी 4 वाजता शिवनेरी , शिवाजी मंदिर , दादर आयोजित करण्यात आलेली आहे.

अकोला : जालनात मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरोधात निदर्शने

अकोला : जालना येथे मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जिंग घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश नारायण चौक येथे शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आणि सखोल चौकशीची मागणी करण्यात आली.

जालना: मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्जने जिल्ह्यात तणाव, परिसरातील काही गावात आंदोलन पेटले, बसेस पेटवल्या

जालना :  जालन्यातील अंतरावली सराटी या गावात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद परिसरात उमटू लागले आहेत. अंतरावली सराटी गावापासून आठ ते दहा किलोमीटरवर असलेल्या शहागड येथे आंदोलकांनी चार बस पेटवून दिल्या  आहेत. 

औरंगाबाद: बीडकडे जाणारी बस वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर सिडको बसस्थानकांवर बीडकडे जाणाऱ्या बसेस थांबवल्या. तर पाचोड बसस्थानक येथूनही बीडकडे जाणाऱ्या बस थांबवल्यात. प्रवाशांचे हाल 

जनावरांनाही असं कोणी मारत नाही, एवढ्या क्रूरतेने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची टीका

बुलढाणा :  जालना येथील मराठा आंदोलकावर केलेला लाठीचार्ज निंदनीय असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. जनावरांना सुद्धा अस कोणी मारत नाही असं आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

जालना : मराठा आरक्षण उपोषण आंदोलन दडपण्याला सरकार जबाबदार आहे; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

जालना : आंदोलन दडपण्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर सरकारकडून काय पावलं उचलण्यात आलीत? असा प्रश्न त्यांनी केला. मागील दीड वर्षात सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काहीच पाऊलं उचलण्यात आली नाहीत. जालन्यातील ह्या भागात मागील काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात अनेक आंदोलनं झालीत. तरीही सरकारनं का पाऊलं उचलली नाहीत, असा सवाल त्यांनी केला. शांततेत सुरु असलेलं आंदोलन दडपण्याचे काम केलं, याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी दानवे यांनी केली.

जालना: अंतरवाली सराटी या गावातील आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सुमारे 50 पोलीस जखमी

जालना: अंतरवाली सराटी या गावातील आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सुमारे 50 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

इतका मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही; संजय राऊत यांचा आरोप

विद्यमान गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून गेल्या वर्षभरापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था लोकांची समस्या लाठीचार्ज होतोय याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही पण शिवसेना या घटनेचा निषेध करतो असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. 


लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण देशभरामध्ये मोदींच्या राज्यात आणि महाराष्ट्रात अजित पवार फडणवीस आणि शिंदेंच्या राज्यामध्ये मोर्चे आंदोलन ही लोकशाहीचे हत्यार वापरतील त्यांच्यावर हल्ले करायचे आणि शिंदे यांच्या राज्यांमध्ये ही हत्यार वापरतील त्यांच्यावरती अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून निर्घृण  हल्ले करायचे अशा प्रकारचं धोरण दिसत आहे


ज्याप्रकारे मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा रक्त सांडलेल आहे मला वाटतं या रक्ताचा प्रत्येक थेंब हा वनव्यासारखा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 


देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आपण पूर्णपणे अपयशी असल्याचेही राऊत यांनी म्हटले. 

बळाचा वापर करून आंदोलन चिरडता येणार नाही, आरक्षण कसे देणार हे सांगा: अशोक चव्हाण

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होत असल्याचे त्यांनी म्हटले.


मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी आणि अन्य न्यायालयीन प्रकरणातील 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.

मराठा समाज सरकारला धडा शिकवणार; विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार

मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक



मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह; शरद पवारांनी व्यक्त केला संताप

गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह


जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावं असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 

पार्श्वभूमी

Jalna Protest :  जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. तर, आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. आज सकाळी आंदोलकाची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. तर, ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. 


29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.  


पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त राज्यभरात पसरल्यानंतर सगळ्याच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, छत्रपती संभाजी राजेंपर्यंत विरोधी पक्षातील सगळ्यांनीच या कारवाईचा निषेध केला आहे. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.