Aditya L-1 Mission : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 ) हे आज (2 सप्टेंबर) सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.


आदित्य एल-1 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार


आदित्य एल-1 या मोहिमेबाबत लोकांमध्ये सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आदित्य एल 1 हे यान आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाईल. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. आदित्य एल 1 या नावावरुनच या मोहिमेचं उद्देश लक्षात येतो. सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलं. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, एल 1 पॉईंट हा पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे. आदित्य एल 1 हे सूर्याच्या एल 1 पॉईंटवरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. 


मिशन आदित्य एल 1 


भारताची ही पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान सप्टेंबरच्या सुरुवातील लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोचं आदित्य एल1 मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे. आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. तिथून हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार असून त्याचा अभ्यास करणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Aditya L-1 Mission : 15 लाख किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर संशोधन, कसा करणार आदित्य एल 1 सूर्याचा अभ्यास?