देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Surat Crime: गुजरात हादरलं! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 सदस्यांनी आयुष्य संपवलं, तीन चिमुकल्यांचाही समावेश


Gujarat Surat Crime News: गुजरातच्या (Gujarat News) सूरतमध्ये (Surat News) घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेनं दिल्लीतील (Delhi Crime) बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाची (Delhi Burari Mysteries Death) आठवण करुन दिली. या घटनेनं गुजरातसह संपूर्ण देशच हादरुन गेला होता. गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संपूर्ण कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी. कुटुंबातील सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. वाचा सविस्तर 


Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह


Matthew Perry : नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील (Friends) चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मॅथ्यूचा (Matthew Perry Passed Away) मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. मात्र मृत्युचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वाचा सविस्तर 


"खूपच लवकर Tinder वर आलायस", डेटिंग अॅपवर मृत पत्नीचा मेसेज, नवऱ्याची भंबेरी; मग पुढे जे घडलं, ते फारच भयानक!


Dead Wife on Tinder Dating App: तुम्हाला कधी भूत दिसलंय का? जगभरातील अनेक लोक भूत दिसल्याचा दावा करतात. कित्येक टीव्ही चॅनल्सवर भूतांचा शोध घेणारे हॉन्टेड शोज देखील सुरू आहेत. अनेकजण तर एक विशिष्ट विधी करुन भूतांना बोलवता येत असल्याचा दावा करतात. पण एखाद्या डेटिंग अॅपवर (Dating App) कधी कोणी भूताशी बोलल्याचं तुम्ही ऐकलंय का? तुमचं माहिती नाही, पण यूकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं डेटिंग अॅपवर भूताशी बोलल्याचा अनोखा दावा केला आहे. वाचा सविस्तर 


World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज थरार, कधी कुठे पाहाल सामना?


IND vs ENG, World Cup : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. वाचा सविस्तर 


29 October In History : महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान, दिल्लीमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणला बॉम्बस्फोट; आज इतिहासात


मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.आजच्यात दिवशी  बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान झाले होते. तसेच महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 29 ऑक्टोबर 1931 रोजी साहित्यिक आणि पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म झाला होता. वाचा सविस्तर 


Horoscope Today 29 October 2023 : रविवारी 'या' राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत सावध राहावे, आजचे राशीभविष्य


Horoscope Today 29 October 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 29 ऑक्टोबर 2023 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज समाजासाठी काही चांगले काम करायचे असेल तर ते करू शकतात, यामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळेल, वृश्चिक राशीच्या लोकांनी आज कोणताही घाईघाईत निर्णय घेणे टाळावे, मग तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे उद्याचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर