Chandra Grahan 2023: ऑक्‍टोबर हा खगोलीय चमत्कारांचा महिना ठरला आहे, ज्याची सुरुवात अग्नीप्रमाणे दिसणाऱ्या सूर्यग्रहणाने झाली आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसलं नाही. पण आज रात्री होणारं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) भारतातही दिसणार आहे. यापूर्वी 5 मे रोजी चंद्रग्रहण झालं होतं. चंद्रग्रहणाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.


चंद्रग्रहणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी



  • चंद्रग्रहण फक्त रात्रीच होतं. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या जवळ असतो, त्याच वेळी चंद्रग्रहण होतं. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.

  • चंद्रग्रहण हे केवळ पौर्णिमेलाच होऊ शकतं, यावेळी चंद्र सुमारे 30 मिनिटं ते एक तासापर्यंत त्याच्या कमाल ग्रहणावर राहतो.

  • संपूर्ण चंद्रग्रहण एक तास आणि तीन चतुर्थांश वेळेपर्यंत असू शकतं.

  • चंद्रग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात गडद भागात येतो, ज्याला पेनम्ब्रेला म्हणतात.

  • जेव्हा चंद्र पेनम्ब्रामध्ये असतो, तेव्हा त्याचा रंग लाल होईल.

  • दरवर्षी सरासरी तीन चंद्रग्रहण होतात.


चंद्रग्रहणाची वेळ काय असेल?


आज (28 ऑक्टोबर) रात्री चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण आज म्हणजेच 28/29 ऑक्टोबर मध्यरात्री 01:05 वाजता होईल. हे चंद्रग्रहण पहाटे 02:24 वाजता संपेल. आज शरद पौर्णिमाही आहे. आज होणारं ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असेल. यामध्ये पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागांवर पडते आणि उर्वरित भागावर सूर्यप्रकाश दिसतो. हे ग्रहण फार काळ टिकत नाही.


चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टींची घ्या विशेष काळजी



  • गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं. कारण ग्रहणाचा गर्भातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये.

  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. पण मंदिरात जाऊ नका.

  • चंद्रग्रहणादरम्यान शिळं अन्न खाणं टाळावं.

  • चंद्रग्रहण काळात तुळशीची पानं शिजवलेल्या अन्नात, दूध आणि दही यांसारख्या पदार्थांमध्ये घालावीत.

  • या काळात झाडं आणि झुडपांना हात लावू नये, असं सांगितलं जातं.

  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा, यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होईल आणि नंतर हा नारळ नदीत विसर्जित करा.

  • या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंचा, चाकूचा वापर करू नये.


हेही वाचा:


Chandra Grahan 2023 : आज चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या राशीनुसार 'या' मंत्रांचा जप करा! शुभ-लाभ होतील, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...