देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: चैन पडेना आम्हाला... 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज निरोप घेणार, सकाळी 10 वाजता आरती, 11 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) आज दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेणार आहे. दरवर्षीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. अगदी 24 तास रांगेत उभं राहून भक्त राजाच्या चरणी नतमस्कत होताना दिसतात. आज लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही भक्तांचा अलोट जनसागर पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर 


Ganpati Visarjan 2023 Live : पुढच्या वर्षी लवकर या... मुंबईसह राज्यभरातील बाप्पांना आज निरोप


Mumbai- Maharashtra Ganesh Visarjan 2023 Live Updates : अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही मोठी जबाबदारी गणेश विसर्जनाच्या दिवशी असते. गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे. वाचा सविस्तर 


Pune Visarjan Miravnuk 2023 Live updates: आज बाप्पा घेणार निरोप, दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा निघाले गावाला


पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते. मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना, असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते... या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात... यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे. वाचा सविस्तर 


China Spy Ship : चीनच्या कुरापती सुरुच! हिंद महासागरात गुप्तचर जहाज, 'ड्रॅगन'चा इरादा काय?


China Ship in Indian Ocean : चीन (China) कुरापती करताना काही थकत नाही. एकीकडे सीमावर्ती भागात (India-China Border) चीनची घुसखोरी सुरु असून आता भारताच्या सागरी सीमांमध्ये (Indian Ocean) चीन घुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीनचं शक्तिशाली गुप्तचर जहाज हिंद महासागरात घुसल्याची माहिती समोर आली आहे. चीनचं गुप्तचर जहाज 'शी यान 6' (Shi Yan 6) हिंद महासागरात दाखल झाले असून ते पुढे सरकत आहे. श्रीलंकेने यासंबंधित माहिती दिली आहे. वाचा सविस्तर


Weather Forecast : बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी! राज्यासह देशभरात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज काय?


IMD Weather Update : मान्सूनच्या (Monsoon) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून काही भागात पावसाचा धुमाकूळ (Rainfall Prediction) पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशी (Ananta Chaturdashi) दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. आज 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार असून राज्यासह देशात ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात आजपासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता (India Meteorological Department) आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात 28 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज (Today Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर


Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! जमावाने पोलिसांच्या गाड्या पेटवल्या, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट


Manipur Violence : मणिपूर (Manipur) मध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये मागील पाच महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरु असून अद्यापही मणिपूरमध्ये हिंसाचार कायम आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा हा हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरमध्ये 27 सप्टेंबरला बुधवारी जमावाने एका नेत्याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांची गाडीही जाळली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


Brij Bhushan Sharan Singh: देशात कुस्तीसाठी मी जे काही केलंय, ते इतिहासात लिहिलं जाईल; बृजभूषण शरण सिंह यांनी थेटच सांगितलं


Brij Bhushan Sharan Singh News: डब्ल्यूएफआयचे (Wrestling Federation of India) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा (Bhupinder Hooda) आणि दीपेंद्र हुडा यांच्यावरील आरोपांवर निशाणा साधला. हरियाणातील रोहतकमध्ये बोलताना ते म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात पोहोचलं असून आम्ही न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नाही. वाचा सविस्तर 


28th September In History : भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म, रेबिजवर लस शोधणारे लुई पाश्चर यांचे निधन; आज इतिहासात...


28th September In History :  इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आजचा दिवसही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिन आहे. तर, रेबीज सारख्या आजारावर प्रभावी लस शोधणारे लुई पाश्चर या शास्त्रज्ञांचा स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 28 September 2023 : आज अनंत चतुर्दशी, 'या' राशीच्या लोकांचे नशीब चमकेल! राशीभविष्य वाचा


Horoscope Today 28 September 2023 : राशीभविष्यानुसार आज 28 सप्टेंबर 2023 रोजी गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीचे लोक आज त्यांच्या कोणत्याही सहकारी किंवा मित्रांना मदत करू शकतात. तूळ राशीच्या लोकांवर देवाचा आशीर्वाद सदैव राहील. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) जाणून घ्या. वाचा सविस्तर