देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 600 हून अधिक नवे कोरोनाबाधित, दोन रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Update in India : देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ (Covid-19 in India) होताना दिसत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे... वाचा सविस्तर
विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न अन् अर्जुन पुरस्कार परत करणार; पंतप्रधानांना लिहिलं पत्र
Vinesh Phogat Major Dhyan Chand Award: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. अशातच, विनेश फोगटनं तिचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. विनेश फोगाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून आपले पुरस्कार परत असल्याची घोषणा केली. मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न (Major Dhyan Chand Khel Ratna Award) आणि अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) परत करत आहे. मला या निर्णयापर्यंत आणल्याबद्दल सर्व ताकदवानांचे खूप आभार, असं विनेशनं पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे... वाचा सविस्तर
बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
US Election 2024: येणारं नवं वर्ष निवडणुकांचं असणार आहे. 2024 मध्ये अमेरिकेसह (US Elections 2024) जगभरातील अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. अमेरिकेत (America) पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका रंजक होणार आहेत. अशातच, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटलं आहे की, सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो. वाचा सविस्तर
Mahadev App : महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रदार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद
Mahadev App : महादेव अॅप (Mahadev App) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी सौरभ चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे... वाचा सविस्तर
Weather Update : थंडीतही पावसाची रिमझिम, उत्तर भारतात हुडहुडी; IMD चा अंदाज काय सांगतो?
Weather Update Today : देशात कुठे थंडी तर कुठे पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, देशात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेस दाट धुके (Fogg) राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या भागात धुके पाहायला मिळेल... वाचा सविस्तर
IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; कसा कराल अर्ज?
IB Jobs 2023: उत्तम नोकरीच्या (Recruitment 2024) शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोनं (Intelligence Bureau Of Recovery) बंपर भरती जाहीर (Recruitment Announced) केली आहे. तसेच, भरतीसंदर्भात (Job Vacancy) एक अधिसूचनाही जारी केली आहे. ज्यानुसार IB मध्ये ग्रेड 2 च्या पदांवर भरती केली जाईल. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत साईट mha.gov.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे. तर, शेवटची तारीख संपल्यानंतर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. या भरती मोहिमेद्वारे गृह मंत्रालयाच्या (MHA) वतीनं इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) ग्रेड 2 च्या 226 रिक्त जागा भरल्या जातील... वाचा सविस्तर
Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री भाईजानने जवळचे मित्र-मंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस मध्यरात्री साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आज सकाळपासून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी केली आहे... वाचा सविस्तर
27 December In History : जन गण मन पहिल्यांदा गायलं, 'दबंग' सलमान खानचा जन्मदिन, पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या; आज इतिहासात
On This Day In History : शेर-ओ-शायरीमध्ये रमणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शायरीचा बादशाह अशी ओळख असलेल्या मिर्झा गालीब यांची आज जयंती आहे. तसेच भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh Birth Anniversary) यांचा जन्म देखील आजच्याच दिवशी झालेला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan Birthday) याचा आज वाढदिवस. जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या... वाचा सविस्तर
Horoscope Today 27 December 2023 : आजचा बुधवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 27 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 27 डिसेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज तुमच्या ऑफिसमध्ये एखादी मोठी चांगली बातमी मिळू शकते, जी तुम्हाला खूप आनंद देईल. कन्या राशीच्या लोकांनी आज कोणतेही नवीन नातेसंबंध निर्माण करण्याची घाई करू नये. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर