Mahadev App : महादेव अॅप (Mahadev App) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी सौरभ चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मोठी कारवाई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईत नजरकैदेत केल्याची माहिती समोर येत आहे. महादेव अॅप प्रकारांत ईडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. सौरभ चंद्राकरचं नाव समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी ईडीच्या विनंतीवरुन रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
सौरभ चंद्राकर UAE या ठिकाणी असल्याचा संशय होता. या आधारे UAE च्या अधिकाऱ्यांनी महादेव बुक अॅप बेटिंग आपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर विरुद्ध कारवाई केली आहे. सौरभ चंद्राकरच्या दुबईतील लपलेल्या ठिकाणाला टाळे ठोकण्यात आले असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. घोटाळेबाज चंद्राकरला लवकरच भारतात आणण्यासाठीही कारवाई होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. यूएईचे अधिकारी सध्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. लवकरच पुढची कारवाई सुरू होणार आहे.
सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैद
महादेव अॅप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद असल्याची माहिती मिळाली आहे. रेड कॉर्नर नोटिसीनंतर दुबईतील अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. सौरभ दुबईत असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्यावर कारवाई करू शकत नव्हत्या. पण भारतीय यंत्रणांनी याप्रकरणी रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची नोटीस बजावली होती. आता त्याच रेड कॉर्नर नोटीसचा आधार घेत दुबईतील अधिकाऱ्यांनी आता सौरभ चंद्राकरला नजरकैदीत ठेवलं आहे. तो ज्याठिकाणी लपून बसला होता त्या घराला त्यांनी टाळे ठोकले आहेत.
सौरभला सध्या चंद्राकरला नजरकैदीत ठेवण्यात आले आहे. महादेव अॅप प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. राजकीय नेत्यांपासून अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेक मंडळी याप्रकरणात जोडले गेले आहेत. त्यामुळे सौरभ चंद्राकरला पकडणं हे सध्या खूप महत्त्वाचं आहे. आता सौरभला नजरकैदेतून सोडवून त्याला पुन्हा भारतात घेऊन येणं यासाठी भारतीय यंत्रणा काम करणार आहे. त्यानंतर याप्रकरणात कोण-कोण सहभागी होतं हे खऱ्या अर्थाने समोर येईल.
संबंधित बातम्या