देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार; कंगनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रिया श्रीनेत अन् रणौतमध्ये ट्विटर वॉर
मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 ) रिंगणात उतरली आहे. भाजपकडून कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी (Mandi) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराचा धुरळा पाहायला मिळत असताना यामध्ये सोशल मीडियाचाही मोठा वापर होताना दिसत आहे. सध्या कंगना राणौत (Kangana Ranaut) विरुद्ध सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. काँग्रेसच्या (Congress) प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कंगनाला लक्ष्य करण्यात आलं. कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर आता ट्विटर वॉर (Twitter War) सुरु झाला (Supriya Shrinate vs Kangana Ranaut Twitter War) आहे. यानंतर आता 'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे', असं वक्तव्य केलेला कंगना राणौतचा एक व्हिडीओ व्हायरल (Kangana Ranaut Viral Video) होत आहे. वाचा सविस्तर
Abhinav Delkar Expulsion: अभिनव डेलकरांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी; दादरा नगर-हवेलीच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी श्वेतल भट यांची नियुक्ती
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group News : मुंबई : दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) आणि विद्यमान खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचे पुत्र अभिनव डेलकर (Abhinav Delkar) यांची शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दादरा नगर हवेलीच्या (Dadra and Nagar Haveli) राज्यप्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा सांगत ठाकरे गटाच्या राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Mumbai Mahim Accident: मुंबईत धुळवडीला गालबोट, माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह हाती, पाचपैकी दौघांचा मृत्यू
Mumbai Mahim Accident News : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) माहीमच्या समुद्रकिनारी (Mahim Chowpatty) बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी धुळवड (Holi 2024) साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल केलं होतं. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान काल मृत्यू झाला. तर पाचव्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरु होता. मात्र, रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेश दरम्यान, त्याचाही मृतदेह हाती लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत. वाचा सविस्तर
ठाकरेंची पहिली यादी 'सामना'तून जाहीर होणार; कोणत्या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Lok Sabha Candidate List : मुंबई : ठाकरे गटाची (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) पहिली यादी आज जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून (Saamana) अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली. वाचा सविस्तर
Weather Update : उन्हाच्या झळांपासून दिलासा! महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाची शक्यता
Weather Update Today : देशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 24 तासात देशासह राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Horoscope 25th March 2024: आजपासून वसंतोत्सव सुरूवात, आज आपल्या आयुष्यात कोणते बदल घडणार? वाचा 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope 26th March 2024: आजचं माझं भविष्य काय? आज काय होणार? किंवा आजचा आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज महाशिवरात्री असून ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर