देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Rajasthan  Assembly Elections 2023: "पक्ष, नाव चोरलं आता बाप चोरायचा प्रयत्न"; राजस्थानातील बॅनरवर शिंदेंच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट; ठाकरेंची सडकून टिका


Rajasthan Assembly Elections 2023: राजस्थानच्या निवडणुकीचा (Rajsthan Assembly Ekection) प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वतः उपस्थित राहत आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजस्थानची वाट धरली आहे. अशातच राजस्थानमधील एक बॅनर राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेत आहे. राजस्थानमधील बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे 'हिंदूहृदयसम्राट' असं लिहिण्यात आलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर 


Mumbai Crime: "एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू"; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल


Mumbai Crime News: मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) टेन्शन पुन्हा वाढलं आहे. पुन्हा एक धमकीचा ईमेल (Threatening Email) आला आहे. पण यावेळी ईमेल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये (Mumbai Police Control Room) नाहीतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एका ईमेलवर आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल 2 (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Terminal 2) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा हा ईमेल होता. वाचा सविस्तर 


Maharashtra Weather Update : राज्यात आठवड्याच्या शेवटी मुंबईसह 'या' भागात पावसाची शक्यता, IMD ची माहिती, हवामानाचे ताजे अपडेट पाहा


Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) काल मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरण बिघडले आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर 


Medical Inflation: भारतात वैद्यकीय खर्चात सातत्यानं वाढ; उपचार 14 टक्क्यांनी महागले


Medical Inflation in India: भारतीयांच्या सरासरी उत्पन्नाचा मोठा भाग वैद्यकीय बिलांवर (Medical Bill) खर्च होतो. देशात यंदा महागाईनं सर्वसामान्यांना हैराण केलं आहे. वाढत्या वैद्यकीय बिलांनीही लोकांना प्रचंड आर्थिक संकटात टाकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर वैद्यकीय महागाई दर (Medical Inflation) भारतात सर्वाधिक आहे. इंश्योरटेक कंपनी (Insurtech Companiy) प्लम (Plum) च्या कॉर्पोरेट इंडिया हेल्थ रिपोर्ट 2023 (Corporate India Health Report 2023) नुसार, भारतातील वैद्यकीय महागाई दर 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वसामान्य नागरिकांवर वैद्यकीय खर्चाचा बोजा सातत्यानं वाढत आहे. वाचा सविस्तर 


Nana Patekar : "पुढच्या वेळी उत्तर प्रदेशला आलात तर..."; माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांना दिली धमकी


Formar IAS Abhishek Singh Nana Patekar Slap Case : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसत होते. नानांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. एकीकडे हा सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं गेलं तर दुसरीकडे सेल्फी घेण्यासाठी नानांजवळ गेलो असता त्यांनी कानाखाली वाजवल्याचा खुलासा चाहत्याने केला. आता याप्रकरणी माजी आएएस अधिकारी अभिषेक सिंहने (IAS Abhishek Singh) व्हिडीओ शेअर करत नानांना धमकी दिली आहे. वाचा सविस्तर 


24 November In History : गुरू तेग बहादूर यांचा स्मृतीदिन, अभिनेते अमोल पालेकर यांचा जन्म; आज इतिहासात...


24 November In History : इतिहासातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवसाचेही एक महत्त्व आहे. शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा स्मृतीदिन आहे. चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ आजच्या दिवशी प्रकाशित केला. वाचा सविस्तर 


Horoscope Today 24 November 2023 : आजचा शुक्रवार खास! मेष ते मीन राशींसाठी कसा असेल दिवस? 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 24 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 24 नोव्हेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अधिकारी त्यांच्या कामावर अधिक खूश होतील. कन्या राशीच्या लोकांना घरातील काही कामासाठी अचानक जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर