Medical Inflation in India: भारतीयांच्या सरासरी उत्पन्नाचा मोठा भाग वैद्यकीय बिलांवर (Medical Bill) खर्च होतो. देशात यंदा महागाईनं सर्वसामान्यांना हैराण केलं आहे. वाढत्या वैद्यकीय बिलांनीही लोकांना प्रचंड आर्थिक संकटात टाकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर वैद्यकीय महागाई दर (Medical Inflation) भारतात सर्वाधिक आहे. इंश्योरटेक कंपनी (Insurtech Companiy) प्लम (Plum) च्या कॉर्पोरेट इंडिया हेल्थ रिपोर्ट 2023 (Corporate India Health Report 2023) नुसार, भारतातील वैद्यकीय महागाई दर 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वसामान्य नागरिकांवर वैद्यकीय खर्चाचा बोजा सातत्यानं वाढत आहे. 


हेल्थ इन्शोरन्सबाबत जागरूकता अत्यंत कमी : अहवाल 


लाईव्ह मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वाढत्या वैद्यकीय बिलांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक दबाव आहे. अहवालात असंही समोर आलं आहे की, देशातील 71 टक्के कर्मचारी वैद्यकीय बिलं स्वत: भरतात आणि केवळ 15 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा संरक्षण देतात. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे 9 कोटींहून अधिक भारतीयांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. त्यांच्या उत्पन्नातील 10 टक्क्यांहून अधिक रक्कम आजारांवर उपचार करण्यासाठी खर्च होत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.


यापूर्वी, नीति आयोगानं (Policy Commission) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 2030 मध्ये देशातील नोकरदार लोकांची संख्या 56.9 कोटी होईल. तर 2022 मध्ये त्यांची संख्या केवळ 52.2 कोटी होती. अशा परिस्थितीत नोकरदारांची संख्या वाढत असतानाही देशात आरोग्य विमा संरक्षणात वाढ होत नाही, ही चिंताजनक परिस्थिती आहे.


हेल्थ इन्शोरन्सबाबत तरुणांमध्ये जागरूकता कमी


20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा सुविधांबाबत फारच कमी जागरूकता आहे. तसेच, 51 किंवा त्याहून अधिक वयाचे लोक अधिक हेल्थ इन्शोरन्स खरेदी करत असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. यासोबतच 42 टक्के लोकांनी हेही मान्य केलं आहे की, कंपनीनं दिलेला हेल्थ इन्शुरन्स कर्मचार्‍यांसाठी अनुकूल असायला हवा. या अहवालात असंही समोर आलं आहे की, भारतात कार्यरत असलेल्या केवळ 15 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा तसेच टेलिहेल्थ इत्यादी अनेक सुविधा देतात.


हेल्थ चेक अप करण्यात भारतीय मागे 


कॉर्पोरेट इंडियाज हेल्थ रिपोर्ट 2023 च्या अहवालातून हेही समोर आलं आहे की, केवळ हेल्थ इन्शोरन्स नाही तर देशातील लोक हेल्थ चेक अप करण्यात करण्यातही मागे पडत आहेत. देशात 59 टक्के लोक आहेत, ज्यांची वार्षिक आरोग्य तपासणी होत नाही. असं 90 टक्के लोक आहेत, जे आपल्या आरोग्याकडे योग्य लक्ष देत नाहीत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


टाटासह 6 कंपन्यांचा IPO 'या' आठवड्यात शेअर बाजारात; 7 हजार 300 कोटी उभारण्याचा कंपन्यांचा मानस