देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Weather Update : आज ठाणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाने काय म्हटलं?


IMD Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra Weather Forecast) गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी (IMD Monsoon Alert) दिसून येत आहे. आज रविवारीही राज्यातील (Maharashtra News) अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), मध्य महाराष्ट्रासह (Madhya Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातही आज वरुणराजा बरसणार आहे. हवामान विभागाकडून (IMD) कोकण विभागाने ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert Today) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department ) जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), गोव्यात (Goa) मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर 


सणासुदीच्या काळात महागाईचा झटका; व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांची वाढ


Commercial LPG Cylinder Price Hike: आज 1 ऑक्टोबर... आजपासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. आधीपासूनच महागाईनं (Inflation) पिचलेल्या सर्वसामान्यांना आज आणखी एक झटका बसला आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price Rise) वाढली आहे. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी वाढ केली आहे. दरवाढीनंतर 19 किलोचा सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे. वाचा सविस्तर 


Bus Accident : तामिळनाडूमध्ये मोठी दुर्घटना!59 प्रवासी असलेली बस 100 फूट दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू


Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमध्ये मोठी बस दुर्घटना घडली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे भीषण अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी या बसला अपघात झाला. वाचा सविस्तर 


Assembly Elections 2023 Survey: राजस्थानमध्ये टफ फाईट, तर मध्यप्रदेश-छत्तीसगढमध्ये काँग्रेसचा वरचष्मा; आगामी निवडणुकांबाबत सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष


Assembly Elections 2023 Survey: वर्षाखेरीस देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2023) पार पडणार आहेत. या 5 राज्यांपैकी मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि राजस्थानवर (Rajasthan) भाजप (BJP) आणि काँग्रेसचं (Congress) विशेष लक्ष असणार आहे. कारण, मध्यप्रदेशात भाजपचं आणि  छत्तीसगढ, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच, ज्या राज्यात आपली सत्ता आहे, त्या राज्यात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी, तर ज्या राज्यांमध्ये आपली सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही पक्ष कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर 


लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप हायकमांडपर्यंत कसा पोहोचणार 543 जागांचा ग्राउंड रिपोर्ट? पक्षाचा मास्टरप्लान


Lok Sabha Elections 2024: देशातील सर्व 543 लोकसभेच्या जागांवर विस्तारकांची नियुक्ती करण्याचा निर्णय भाजपनं (BJP) घेतला आहे. यासाठी पक्ष हाय कमांडनं राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल (Sunil Bansal) यांच्या नेतृत्वात 10 नेत्यांची समिती देखील तयार केली आहे. पक्षाचे हे 10 नेते वेगवेगळ्या राज्यांमधील विस्तारकांची निवड करतील आणि त्यांच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था करतील. यानंतर, निवडण्यात आलेल्या विस्तारकांना वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पार्टी उमेदवार जिंकण्यासाठी नियुक्ती केली जाईल. वाचा सविस्तर 


Khalistani : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन, गुरुद्वारेत जाण्यापासून रोखलं; भारताकडून संताप व्यक्त


UK Khalistan Supporter : ब्रिटनमधील (Britain) भारतीय उच्चायुक्त (Indian Ambassador) विक्रम दोराईस्वामी (Vikram Doraiswami) यांना स्कॉटलंड (Scotland) मधील गुरुद्वारेमध्ये (Gurudwara) जाण्यापासून रोखण्यात आलं. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत खलिस्तानी समर्थकांनी गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानींनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं. भारताने घटनेवर संताप व्यक्त करत याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने याप्रकरणी एक निवेदन जारी करत हे वर्तन अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. भारतीय उच्चायुक्तांसोबत केलेल्या गैरवर्तनाची ब्रिटीश नेत्यांनी देखील निंदा केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. वाचा सविस्तर 


1st October In History : 'आधुनिक वाल्मिकी' ग. दि. माडगूळकर, संगीतकार सचिन देव बर्मन यांचा जन्म, भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची घोषणा; आज इतिहासात


1st October In History : प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या मोठ्या घटनेचा साक्षीदार असते. 1 ऑक्टोबर 1953 हा दिवस आंध्र प्रदेशची भाषेवार घोषणा झाल्यामुळे या दिवसाला आंध्र प्रदेशचा निर्मिती दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असणारे प्रतिभावंत लेखक, गीतकार मराठी विश्वातील गदिमा अर्थात ग.दि. माडगूळकर यांचा आज जन्मदिन आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 01 October 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत मिळू शकते बढती, आजचे राशीभविष्य


Horoscope Today 01 October 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 01 ऑक्टोबर 2023, रविवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कन्या राशीच्या लोकांचा खर्च होऊ शकतो, उर्वरित राशींसाठी आजचा रविवार काय घेऊन येतो? जाणून घ्या आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर