देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Rule Changes from 1st January 2024 : नवीन वर्षात खिशाला कात्री! UPI, ITR सह अनेक आर्थिक नियमांत बदल


Rule Changes from 1st January 2024 : आज नववर्षाच्या (Happy New Year 2024) पहिल्या दिवसापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम (Financial Rule Change) बदलले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे. 1 जानेवारी 2024 पासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, हे सविस्तर जाणून घ्या... वाचा सविस्तर 


ABP C Voter Survey: कलम 370 हटवणं, अयोध्येतील भव्य राम मंदिर; आगामी निवडणुकीत भाजपला याचा कितपत फायदा? सर्वेक्षणाचा निष्कर्ष पाहून थक्क व्हाल!


ABP Cvoter Survey: आज इंग्रजी नववर्षाचा (New Year 2024) पहिला दिवस. नवंवर्ष हे निवडणुकाचं वर्ष असणार आहे. प्रत्येक पक्षानं यासाठी तयारी सुरू केली आहे. 2024 मध्ये देशभरात सार्वत्रिक निवडणुका (Elections 2024) होणार आहेत. निवडणुकीपूर्वी, एबीपी न्यूजच्या सी व्होटरनं (ABP News C Voter Survey) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामगिरीवर एक सर्वेक्षण केलं आहे. वाचा सविस्तर 


Weather Update : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज


Weather Update Today : आज नवीन वर्षाच्या (Happy New Year 2024) पहिल्या दिवशी तापमानात (Temperature) आणखी होण्याचा घट अंदाज आहे. पूर्वेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे गारठा वाढला आहे. उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील भागात थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम राहणार आहे... वाचा सविस्तर 


Vivek Phansalkar: राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे; रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे निर्णय


Vivek Phansalkar State Director General Of Police : पोलीस महासंचालकपदाचा (State Director General Of Police) अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे देण्यात येणार आहे. सध्याचे पोलीस (Maharashtra Police) महासंचालक रजनीश सेठ निवृत्त झाल्यामुळे विवेक फणसाळकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत पोलीस महासंचालकपदी विवेक फणसाळकर असणार आहेत... वाचा सविस्तर 


Koregaon Bhima : पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी


Koregaon Bhima : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima Latest Update) या ठिकाणी आज 206 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या (Shaurya Din) पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (Koregaon Bhima)  विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो... वाचा सविस्तर 


1st January In History :  भीमा कोरेगावच्या लढाईत पेशव्यांचा पराभव, महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, क्युबात क्रांती; आज इतिहासात...


1st January In History :  इतिहासात प्रत्येक दिवसाला एक महत्त्व असते ते त्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे. या ऐतिहासिक घटनांचा परिणाम तत्कालीन समाजावर होतोच शिवाय भविष्यातही त्याची नोंद घेतली जाते. आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. तर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा आजच्या दिवशी सुरू केली होती. जगाच्या इतिहासात अजरामर घटना असलेली क्युबन क्रांतीदेखील आजच्या दिवशी घडली होती... वाचा सविस्तर 


Horoscope Today 1 January 2024 : नववर्ष 2024 चा पहिला दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी शुभ! आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 1 January 2024 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या लोकांना आज अधिकार्‍यांकडून बोलणी खावी लागू शकतात. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात जास्त लोभी राहू नका. तूळ राशीच्या लोकांनी जे काही काम हाती घेतले आहे त्यात यश मिळेल. तुमच्या मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील.सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर