देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर ठाम, आधीचंच वेळापत्रक सादर करणार, 'ABP माझा'ला खात्रीलायक सुत्रांची माहिती


Maharashtra Political Crisis : आमदार अपात्र दिरंगाई प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ताशेरे ओढलेले. त्यानंतर अध्यक्षांना आज पुन्हा सुनावणीबाबत सविस्तर माहिती देऊन सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेले. अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन यापूर्वी तयार केलेलं वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती मिळत आहे. अध्यक्ष वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसेच, न्यायालयानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकात बदल करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली असल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर 


Same Sex Marriage : देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार? आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय


Supreme Court Same-Sex Marriage : समलिंगी विवाहाला (Same-Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) निकाल देणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. आज सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस रविंद्र भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पीएस नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर याची 20 मे 2023 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये जवळपास 20 याचिकांवरील सुनावणी करण्यात आली. वाचा सविस्तर 


Weather Update : देशात पुढील 48 तास पावसाची शक्यता, केरळला ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस


Weather Update Today :  देशासह राज्यातून अद्याप पावसाने (Monsoon) पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पश्चिम भारतात पुढील 48 तास पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान या राज्यांमधून मान्सून परतला आहे. वाचा सविस्तर 


नववधुला एक तोळं सोनं, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट, तेलंगणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात एकापेक्षा एक मोठ्या घोषणा!


Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचं (Telangana Election 2023) बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणात (Telangana Elections 2023) 30 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. याच निवडणुकांसाठी काँग्रेसनं सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसनं जाहीरनाम्यात विवाहप्रसंगी नववधूला दहा ग्रॅम सोनं, एक लाख रुपये रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा, अशा आश्वासनांची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची सध्या केवळ तेलंगणातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा आहे. वाचा सविस्तर 


देशाची फाळणी व्हायला नको होती, ती एक ऐतिहासिक चूक; खासदार असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य चर्चेत


AIMIM Chief, MP Asaduddin Owaisi on India Partition : नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांनी देशाच्या फाळणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारताची फाळणी (India Partition) व्हायला नको होती, असं वक्तव्य करत ओवेसींनी देशाच्या फाळणीच्या घटनेला ऐतिहासिक चूक असल्याचं म्हटलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा देश दुर्दैवानं विभागला गेला, जे व्हायला नको होते, असंही एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख ओवेसी म्हणाले आहेत. वाचा सविस्तर 


Biden to Visit Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन इस्रायलला भेट देणार! हमास-इस्रायल युद्धाचा 11 वा दिवस, हमासचा तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेट हल्ला


Israel-Palestine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) इस्रायल दौऱ्यावर (Israel Visit) जाणार आहेत. इस्रायल-हमास युद्धाला 10 दिवस उलटून गेले आहेत. इस्रायलवर हमासचे रॉकेट हल्ले सुरूच आहेत. तर, दुसरीकडे गाझामध्ये इस्रायलकडून बॉम्बहल्ले थांबवण्याचं चिन्ह दिसत नाही. आतापर्यंत इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांवर हवाई आणि समुद्री मार्गाने रॉकेट आणि बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत. पण, आता इस्रायली सैनिक गाझामध्ये घुसून हमासच्या हदशतवाद्यांना लक्ष करणार आहेत. वाचा सविस्तर 


17 October In History : अभिनेत्री स्मिता पाटील आणि क्रिकेटविश्वात जंबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल कुंबळेचा जन्म, मदर टेरेसांना शांतीचा नोबेल; आज इतिहासात


मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता पाटीलचा (Smita Patil Birthday) आज जन्मदिन. स्मिता पाटीलने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळंच स्थान निर्माण केलं. तसेच क्रिकेटविश्वात जंबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल कुंबळेचाही आज जन्मदिन आहे. णून घेऊया आजचा दिवस इतिहासात कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Tuesday 17 October 2023 : मेष, धनु, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Tuesday 17 October 2023 : आज मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तर, कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा मंगळवार नेमका कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर