देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


NCP MLA Disqualification Case: कोणाचे आमदार अपात्र, दादांचे की थोरल्या पवारांचे? आज विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात निकाल


NCP MLA Disqualification Case: मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा (NCP MLA Disqualification Case) निकाल आज (15 फेब्रुवारी 2024) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्याकडून दिला जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय संपूर्ण राज्याचं (Maharashtra Politics) लक्षंही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लागलं आहे. वाचा सविस्तर...


Maharashtra School : प्राथमिक शाळा नऊ वाजेनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध


Maharashtra School Time Change : पूर्व प्राथमिक (Pre-Primary School) आणि प्राथमिक शाळा (Primary School) सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध दर्शवला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूलबस मालकांचं (School Bus Owners) म्हणणं आहे. सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भ़ाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. वाचा सविस्तर...


Weather Update : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता, तुमच्या भागातील हवामान जाणून घ्या


Weather Update : राज्यात (Maharashtra) सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुणे (Pune) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर...


सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा; शरद पवारांचं केंद्र सरकारला आव्हान


Sharad Pawar On Cyrus  Poonawalla: पुणे : कोरोनामध्ये (Covid-19) लाखो रूपयांच्या लस मोफत वाटप करून, नागरिकांची मदत करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus  Poonawalla) यांना केंद्र सरकारनं (Central Government) भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. वाचा सविस्तर...


Farmers Protest : शेतकऱ्यांची चलो दिल्लीची घोषणा!आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय? आंदोलनासंबंधित प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं


Farmers Protest News : शेतकऱ्यांनी (Farmers) पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. एक वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी (Delhi Farmers Agitation) जोरदार आंदोलन केलं होतं. यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी मागणी मान्य करत कृषी कायदे रद्द केले. मात्र, आता पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एमएसपीबाबत कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. वाचा सविस्तर...


15 February In History : सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा, मिर्झा गालीब यांचे निधन, महाकवी नामदेव ढसाळ यांचा जन्म; आज इतिहासात


On This Day In History : प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व असते. इतिहासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी आज 15 फेब्रुवारी रोजी घडल्या. महान तत्ववेता सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा आज जन्मदिवस आहे. ऊर्दू शायर मिर्झा गालिब यांनी आजच्या दिवशी जगाचा निरोप घेतला होता. दलित पँथरचे संस्थापक आणि कवितेच्या माध्यमातून वंचितांवरील अन्यायाविरोधात व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे नामदेव  ढसाळ यांचा आज जन्मदिवस आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं, हे वाचा सविस्तर...


आजचा गुरुवार खास, साईबाबांच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं लागतील मार्गी, वाचा 12 राशींचे भविष्य


Horoscope Today 15 February 2024 : आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला (Daily Horoscope)  मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...