Weather Update : राज्यात (Maharashtra) सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुणे (Pune) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे



पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल-किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. शनिवारी, 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. 


 


 








 


 


काही भागात गारपीट 


हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिमालयीन भागात थंड वाऱ्याचा प्रवाह सक्रिय होत असल्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे, यामुळे गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


 


 


 


शेती, फळबागांवर परिणाम


महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे शेती, फळबागांवरसुद्धा त्याचा परिणाम हात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. खोकला, सर्दी यासारखे आजारदेखील बळावले आहेत


 


हेही वाचा>>>


Rain Update : विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीचा कहर; कापसाच्या वाती झाल्या, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान