देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 900 जण जखमी, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)
LIC क्लेम सेटलमेंट्सचा त्वरीत निपटारा करणार, ओडिशा रेल्वे अपघातातील बाधित लोकांच्या मदतीसाठी पाऊल
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे एलआयसी ऑफ इंडियाकडून पत्रक काढत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. ओडिशा रेल्वे अपघातातील बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्लेम सेटलमेंट्सचा त्वरीत निपटारा करत आर्थिक मदत देण्याचं आश्वासन या पत्राच्या माध्यमातून एलआयसीने दिलं आहे. (वाचा सविस्तर)
आयएलएफएसकडून सहा हजार कोटींचा गंडा; 19 बँकांची फसवणूक, फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
आयएल अँड एफएस ( IL&FS) कंपनीने देशातील प्रमुख 19 बँकांची तब्बल 6,524 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना या घोटाळ्यााच फटका बसला आहे. (वाचा सविस्तर)
ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरील 14 औषधांवर बंदी; पॅरासिटॉमॉलसह कोडीन सिरपचाही समावेश, 'ही' औषधे आरोग्यासाठी घातक
केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती (वाचा सविस्तर)
Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य
आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना धनलाभ होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशींसाठी कसा असे आजचा शनिवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यशाली तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य (वाचा सविस्तर)
चीनमध्ये तियानमेन स्क्वेअर नरसंहार, विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म आणि अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म; आज इतिहासात
जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 जून चे दिनविशेष