देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
‘मोखा’ चक्रीवादळ 10 मे ला तयार होण्याची शक्यता, मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.. 10 मे रोजी म्हणजेच उद्या ‘मोखा’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच 11 मे रोजी बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे हे चक्रीवादळ सरकेल असा अंदाज आहे. (वाचा सविस्तर)
डॉ.प्रदीप कुरुलकर यांची एटीएस कोठडी आज संपणार, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी एटीएसच्या अटकेत
पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक यांची एटीएस कोठडी संपत आहे. पुणे सत्र न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यानी नक्की कोणती माहिती दिली आणि नक्की कोणता तपास करायचा आहे याची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली जाणार आहे. (वाचा सविस्तर)
60 लोकांचा जीव गेला, 1700 घरं पेटवण्यात आली; मणिपूरमध्ये आता काय परिस्थिती आहे?
मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 60 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 1700 घरं पेटवण्यात आली आहेत. त्यामुळे परिस्थीती बिकट असून बेघर झालेल्या लोकांनी निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. (वाचा सविस्तर)
सीरमचे संचालक जवरेह पुनावाला यांच्या 41.64 कोटीच्या चार मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
जवरेह सोली पुनावाला यांच्या मालकीच्या 41.64 कोटी रुपयांची चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्यानुसार ईडीने ही कारवाई केली असून पूनावाला यांच्या मालकीच्या सीजे हाऊस, वरळी, मुंबई येथे असलेल्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. जवरेह सोली पुनावाला हे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक असून त्यांचं नाव पनामा पेपर्समध्ये आलं होतं. (वाचा सविस्तर)
'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मिथुन राशीचे लोक कुटुंबियांबरोबर वेळ घालवतील. कुंभ राशील जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)
महाराणा प्रताप, गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म,कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन; आज इतिहासात
इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवशी घडलेल्या घटनांचे परिणाम वर्तमान, इतिहासावरही घडत असतात. आजचा दिवसही अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. आजच्या दिवशी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महात्मा गांधी यांचे गुरू, 19 व्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून ओळखले जाणारे गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. महाराष्ट्रात गरीब, बहुजन वर्गापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतीदिन आहे. (वाचा सविस्तर)