Mocha Cyclone: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.. 10 मे रोजी म्हणजेच उद्या ‘मोखा’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच 11 मे रोजी बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे हे चक्रीवादळ सरकेल असा अंदाज आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. मात्र बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार या बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच या वादळाचं गांभीर्य लक्षात घेत 8 मे ते 12 मे दरम्यान मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मोखा वेगाने पुढे सरकत आहे. मोखा वादळाचे सर्वात गंभीर परिणाम पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या राज्यांना देखील चक्रीवादळचा तडाखा
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मोखा चक्रीवादळ हे शक्तिशाली आहे. वादळाचा तडाखा मध्य प्रदेश ते छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत दिसून येईल. यादरम्यान, राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 8 ते 12 मे दरम्यान किनार पट्टीवर ताशी 70 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोबतच बंगालच्या उपसागरातील आणि अंदमानच्या बेटांवरील पर्यटन आणि शिपिंगबाबत नियमावली जाहीर करत समुद्राकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'मोखा' नावाची चर्चा का?
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्य देशांनी स्वीकारलेल्या नामकरण प्रणाली अंतर्गत या चक्रीवादळाला 'मोखा' असे नाव दिले जाईल. येमेनने या चक्रीवादळाचे नाव 'मोखा' या आपल्या लाल समुद्राच्या किनार्यावरील बंदर शहराच्या नावावर सुचवले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :