मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या एकूण सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं नोटाबंदी, जीएसटी, राम मंदीर, तिहेरी तलाक, जम्मू काश्मिरमधून 370 कायदा हटवण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. त्यानंतर कोरोनासारख्या महामारीनं जगासह देशालाही मोठा फटका बसला. नुकतेच पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल आणि पंतप्रधान मोदींबाबत देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Continues below advertisement


याबाबत एबीपी माझा आणि सी व्होटरनं देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेची मत एका सर्व्हेद्वारे जाणून घेतली. यात केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीबाबत जनता कितपत समाधानी आहे याबाबत जाणून घेतलं गेलं. 


केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी- 24.27 टक्के
काही प्रमाणात समाधानी - 38.44  टक्के
असमाधानी - 35.89  टक्के
सांगता येत नाही - 1.4   टक्के


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात? 
खूप समाधानी- 32.97  टक्के
काही प्रमाणात समाधानी - 33.43  टक्के
असमाधानी - 33.6  टक्के
सांगता येत नाही - 00  टक्के


यापैकी कुणाच्या कामगिरीवर तुम्ही नाराज आहात आणि संधी मिळाली तत्काळ बदलाल? 
स्थानिक प्रशासन- 4.23 टक्के
राज्य सरकार - 11.79 टक्के
केंद्र सरकार - 27.79 टक्के
सांगता येत नाही - 56.19 टक्के 


ABP News-C voter Survey: पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण? लोकांच्या मनात कोण?


देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात?


खूप समाधानी- 21.11टक्के
काही प्रमाणात समाधानी - 28.32टक्के
असमाधानी - 41.84टक्के
सांगता येत नाही - 8.73 टक्के


नोट: मोदी सरकारनं दुसऱ्या टर्मची दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझासाठी सी व्होटरनं देशाचा मूड जाणून घेतला. आजचा हा सर्व्हे देशभरात 1 जानेवारी ते 28 मे दरम्यान घेतला गेला. या सर्व्हेत 139199 लोकांची मतं जाणून घेतली.  सर्व्हेमध्ये सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतली गेली. देशाचा मूडमधील पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के असू शकतो.