नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी न्यूज-सी-व्होटर्सनने महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरुन देशाच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं. यासाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केलं आहे. यात जनतेला अनेक प्रश्न विचारले गेले, त्यातील एक प्रश्नही विचारला गेला की पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रश्नासाठी बर्याच मोठ्या नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवली गेली.
तुमच्या मते पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण?
- नरेंद्र मोदी- 44.14 टक्के
- राहुल गांधी - 12.36 टक्के
- सोनिया गांधी - 2.91 टक्के
- मनमोहन सिंह- 6.55 टक्के
- योगी आदित्यनाथ - 1.22 टक्के
- ममता बॅनर्जी - 0.34 टक्के
- अरविंद केजरीवाल - 3.85 टक्के
- इतर- 13. 76 टक्के
- सांगता येत नाही - 14.87 टक्के
अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीका होताना दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती आहे.
तुम्हाला थेट पंतप्रधान निवडीची संधी दिल्यास राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यापैकी कुणाला निवडणार?
- नरेंद्र मोदी - 54.05 टक्के
- राहुल गांधी - 25.34 टक्के
- यापैकी नाही - 11.15 टक्के
- सांगता येत नाही - 9.46 टक्के
टीप - मोदी सरकारनं दुसऱ्या टर्मची दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझासाठी सी व्होटरनं देशाचा मूड जाणून घेतला. आजचा हा सर्व्हे देशभरात 1 जानेवारी ते 28 मे दरम्यान घेतला गेला. या सर्व्हेत 139199 लोकांची मतं जाणून घेतली. सर्व्हेमध्ये सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतली गेली. देशाचा मूडमधील पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के असू शकतो.