नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल दौर्‍यावरून सुरू झालेल्या वादाबद्दल आता ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया आली आहे. पंतप्रधानांशी बोलल्यानंतरच मी दिघाला रवाना झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलंय की माझा विजय केंद्र सरकारच्या पचनी पडत नाही. बंगालच्या जनतेसाठी मी पंतप्रधानांच्या पायाला स्पर्श करण्यासही तयार आहे.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले मौन सोडत म्हटले की त्यांना आमची जय सहन होत नसल्याने ते विरोध करत आहेत. बैठकीस उशिरा पोहोचण्याच्या आणि लवकर निघण्याच्या वादावर ममता म्हणाल्या की, माझे वेळापत्रक गुरुवारीच निश्चित करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या भेटीबद्दल मला उशीरा माहिती मिळाली.


अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की लढाई माझ्यासोबत आहे, माझ्या अधिकाऱ्यांशी नाही. पश्चिम बंगालच्या वतीने त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे, की शक्य असेल तर माझ्या अधिकाऱ्यांना यापासून दूर ठेवावे व मुदतवाढ देण्यात यावी आणि बदलीचा आदेश रद्द करावा.


ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधानांच्या भेटीचा कार्यक्रम माझ्या कार्यक्रमानंतर माहित झाला. कलाईकुंडामध्ये पंतप्रधानांची 20 मिनिटं वाट पाहिल्याचे ममता यांनी सांगितले. याअगोदर त्या दोन ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यानंतर तिला दिघाला जावे लागले. पंतप्रधान मोदी यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्या दिघाला रवाना झाल्याचे मुख्यमंत्री ममता यांनी सांगितले.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, "एका योजनेंतर्गत मला रिकाम्या खुर्च्या दाखविल्या. मी का बसेल? जेव्हा मी तिथे राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाहिले ज्यांना या बैठकीत बसण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा मी पंतप्रधान मोदी यांना भेटले.


मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की यात आमचा दोष काय? "गेल्या 2 वर्षात संसदेत विरोधी नेत्यांची गरज का भासली नाही किंवा गुजरातमधील विरोधी पक्षनेत्यांना का बोलावले जात नाही (बैठकीमध्ये). जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा राज्यपालांनी कायदा व सुव्यवस्थे संदर्भात चर्चा केली आणि केंद्रीच टीम पाठवली.