एक्स्प्लोर

आनंदाची बातमी! केरळात मान्सूनची वर्दी, दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात पोहोचणार

संपूर्ण भारताला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने अखेर वर्दी दिली आहे. मान्सूनचे भारताचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात मान्सून दाखल झाला आहे.

कोची : संपूर्ण भारताला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने अखेर वर्दी दिली आहे. मान्सूनचे भारताचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने अधिकृतरित्या मान्सून भारतात दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे. भारतात दाखल होण्याचे सर्व निकष मान्सूनने पूर्ण केले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. 5 जूनपासून केरळ, कर्नाटकचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. काही वेळापूर्वी भारतीय हवामान विभागाने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, पुढील चोवीस तासांत मान्सूनची ईशान्य भारतातील शाखाही सक्रीय होणार आहे. त्यामुळे ईशान्य दिशेकडूनही मान्सून येणार आहे. एकाच वेळी देशवासियांना हवामान विभागाने दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. पाहा संपूर्ण व्हिडीओ सुरुवातीला मान्सून 5 दिवस उशिराने म्हणजेच 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यात आणखी दोन दिवस उशीर झाला आहे. मान्सून पहिल्यांदा केरळच्या समुद्रकिनारी वर्दी देतो आणि त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये मान्सूनचं आगमन होतं. यानंतर पुढील 45 दिवस देशभरात मान्सूनचा पाऊस कोसळतो. येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार आहे. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आधीच दुष्काळ त्यात मान्सून लांबणीवर पडल्याने शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून भारतात दाखल झाला असला तरी मान्सूनचे वारे ताकदवान नाहीत. त्यामुळे उशिरा आलेल्या मान्सूनची इथून पुढची प्रगतीदेखील संथ गतीने होणार आहे. गोवा, महाराष्ट्राचा किनारी भाग आणि मध्य महाराष्ट्रात 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात येईपर्यंत मान्सूनची गती संथ राहील. परंतु मान्सूनच्या वाऱ्यांची गती वाढेल आणि उत्तर भारतात मान्सून नेहमी पोहचतो त्याच कालावधीत पोहचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणारी मान्सूनची शाखादेखील येत्या अठ्ठेचाळीस तासात सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget