एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
![येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार Monsoon Onset In Kerala In Next 48 Hrs Latest Updates येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/14182853/Monsoon_Clouds-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पुढील दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिली आहे. तर महाराष्ट्रातही 2 ते 3 जून दरम्यान पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
ज्या मान्सूनची तुम्ही-आम्ही आतुरतेनं वाट पाहतो आहोत, तो पुढच्या 48 तासात देवभूमीत दाखल होतो आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानंही शेतीच्या कामाची लगबग सुरु केली आहे.
अकोला, अमरावतीत मुसळधार पाऊस
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पाऊस झाला. काल दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तिकडे अमरावतीतही मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल माल पावसात भिजला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion