एक्स्प्लोर
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
मुंबई : येत्या 48 तासांत मान्सून भारताच्या देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल होत आहे. मान्सूनच्या प्रवासावर नवा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
श्रीलंकेत 4 तारखेलाच मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर 6 दिवसांनी मान्सून भारतात दाखल होतो. त्यामुळे उशीर झाला असला तरी येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
साधारणपणे श्रीलंकेनंतर पुढच्या 6 दिवसात मान्सून भारतात दाखल होतो. श्रीलंकेत 4 जून रोजी मान्सून दाखल झाल्यामुळे 9 ते 10 तारखेपर्यंत मान्सून भारतात प्रवेश करेल, असा अंदाज 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
श्रीलंकेत मान्सून साधारण 25 मे पर्यंत दाखल होतो. मात्र यावर्षी मान्सून जवळपास आठवडाभर उशिराने दाखल झाला आहे. एकूणच मान्सूनची वाटचाल 8 ते 10 दिवस उशिराने होत आहे. श्रीलंकेनंतर आता येत्या 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबईसह आसपासच्या परिसरातही पुढील 48 तासात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असाही अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. तसंच या परिसरात ढगाळ वातावरण राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील. मात्र त्यानंतर वातावरण पुन्हा कोरडं होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement