Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहम भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी (3 एप्रिल) नवरेह महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केले. जम्मूतील संजीवनी शारदा केंद्रातर्फे एक ते तीन एप्रिल दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मोहम भागवत (Mohan Bhagwat) यांनी काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केलं. कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी काश्मिरी हिंदू समुदायाला नवरेहच्या शुभ सणानिमित्त मायदेशी परतण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी सांगितले की, संकल्प पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आता मातृभूमीवर असं वसायचं आहे की, आता तिथून कुणीही तुम्हाला बाहेर काढू शकणार नाही. सर्वांनी एकोप्याने राहा.
नवरेह महोत्सवाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी राजा ललितादित्यच्या इतिहासावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, या चित्रपटामुळे सत्य जगासमोर आलं. यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. सर्वसाधारण लोक देखील काश्मिरी हिंदूंचे दु:ख समजून घेत आहेत. त्या लोकांच्या मनात काश्मिरी हिंदू लोकांबाबत सहानुभूती निर्माण होत आहे.
पुढे ते म्हणाले, संकट येत असतात, काही वेळा भयंकर संकट येतात. ही संकट अनेक वेळा जास्त काळ राहतात. अशी संकट पुन्हा येऊ नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. लोकांनी जागे झालं पाहिजे. कट्टरपणा नसावा. सर्वांनी एकत्र राहावे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Adani : अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, जाणून घ्या किती आहे संपत्ती
- YouTuber भुवन बामच्या व्हिडीओवरून नवा वाद; महिलांचा अपमान केल्याचा आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाची कठोर कारवाईची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha