Pm Modi Letter To Nawaz Sharif: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे. एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांना हे पत्र पाठवले आहे.


पंतप्रधान मोदी दहशतवादाविरुद्ध म्हणाले 


सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, शाहबाज शरीफ यांना पाठवलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं आहे. सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितले की, या पत्रात पंतप्रधानांनी शाहबाज शरीफ यांना केलेल्या ट्वीटच्या धर्तीवर शुभेच्छा देण्याबरोबरच त्यांच्याशी चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी आपल्या या पत्रात लिहिले आहे की, भारतालाही चर्चेच्या मार्गातून एकत्रितपणे गरिबीसह इतर समस्या सोडवायच्या आहेत.''


विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही त्यांच्या शपथविधीसाठी स्वत: निमंत्रित केले होते. यासोबतच त्यांना भेटण्यासाठी ते स्वतः लाहोरला गेले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले. शाहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेते शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत. संयुक्त विरोधी पक्षाकडून शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यात आले होते. शाहबाज शरीफ यांनी 11 एप्रिल रोजी पाकिस्तनाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी त्यांना शपथ दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha