एक्स्प्लोर

G7 Summit : मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

Modi Trump G7 Meeting: पीएम मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध असेल, अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली.

नवी दिल्ली : फ्रान्समधील एवियन येथे आयोजित G7 परिषदेच्या (G7 Summit 2026) पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक (Bilateral Meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत एक ऐतिहासिक आणि मोठे विधान केलं आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारतावर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असं आश्वासन ट्रम्प यांनी दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले की, "आमच्यामध्ये कोणताही लिखित करार (Written Agreement) नसला, तरीही अमेरिका भारताला पूर्ण सहकार्य करेल. मात्र, जर भारतामध्ये दुसरा कोणताही पंतप्रधान असेल, तर मी याबद्दल खात्री देऊ शकत नाही."

India US Maritime Security : 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चा मुद्दा

या बैठकीदरम्यान दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) येथे झालेल्या अमेरिकन हल्ल्यात तीन भारतीय नाविकांच्या (Indian Sailors) झालेल्या मृत्यूवरही महत्त्वाची चर्चा झाली. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकले आहे. हे अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काम आहे. आम्ही या प्रकरणावर गांभीर्याने काम करत आहोत."

दुसरीकडे, संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर तैनात असलेल्या लाखो भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा (Sailors Security) मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'सारख्या संवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नाविकांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

PM Modi on US Iran Peace Deal : अमेरिका-इराण शांतता कराराचे कौतुक

पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, "पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या (US-Iran Peace Deal) प्रगतीचे मी स्वागत करतो. मला पूर्ण विश्वास आहे की हा करार लागू करताना भारतीय नाविकांच्या सुरक्षेच्या मुद्द्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल."

या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक आणि सामरिक संबंध (India US Strategic Relations) आगामी काळात अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget