एक्स्प्लोर

'मेहरम' प्रथा बंद करण्याचं श्रेय मोदींनी घेऊ नये : ओवेसी

'परदेशी सरकारनं जे काम आधीच केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान का घेत आहेत?' असा सवाल ओवेसींनी मोदींना विचारला आहे.

नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकनंतर मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली होती. त्यानंतर इंडिया मुस्लीम पर्सनल लॉसह एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या या घोषणेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'परदेशी सरकारनं जे काम आधीच केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान का घेत आहेत?' असा सवाल ओवेसींनी मोदींना विचारला आहे. सौदी हज अथॉरिटीनं आधीच परवानगी दिली आहे : ओवेसी पंतप्रधान मोदींनी 'मेहरम'बाबत घोषणा केल्यानंतर ओवेसींनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. 'सौदी हज अथॉरिटीनं 45 वर्षाहून जास्त वय असलेल्या कोणत्याही मुस्लिम महिलेला महेरमशिवाय हज यात्रा जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे जे काम परदेशी सरकारनं केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींनी घेता कामा नये.' असं ओवेसी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणती घोषणा केली होती? “जर एखादी मुस्लीम महिला हज यात्रेला जाऊ इच्छित असेल, तर तिला मेहरम (एक पुरुष संरक्षक) शिवाय जाता येत नव्हते. याबाबत अधिक माहिती घेतल्यावर मला समजलं की, ही प्रथा सुरु करण्यामागे आम्हीच लोक आहोत. या प्रथेला कोणत्याही इस्लामिक देशात मान्यताच नाही.” मोदी पुढे म्हणाले की, “अल्पसंख्याक मंत्रालयाने यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे कोणतीही मुस्लीम महिला पुरुष संरक्षकाशिवाय हज यात्रा सहज करु शकते. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत 1300 महिलांनी विना मेहर हज यात्रा करण्यासाठी अर्ज केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.” काय आहे ‘मेहरम’? ‘मेहरम’ म्हणजे ज्या मुस्लीम महिलेचा विवाह झालेला नाही. ती महिला आपले वडील, सख्खा भाऊ यांच्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकत नव्हती. त्यामुळे हज यात्रेसाठी मुस्लीम महिलेला ‘मेहरम’ अतिशय आवश्यक असायचा. अनेक उलेमा मुस्लीम महिलांना एकट्याने हज यात्रा करणे म्हणजे शरियतच्या विरोधी असल्याचं सांगतात. दरम्यान, हज यात्रेसंदर्भातील नियमानुसार, वयाची 45 वर्ष पूर्ण केलेल्या महिलेला विना ‘मेहरम’ हज यात्रा करता येत होती. पण आता हिच प्रथा बंद केल्याने कोणत्याही वयोगटातील मुस्लीम महिलेला हज यात्रा करता येणार आहे. संबंधित बातम्या : तिहेरी तलाकनंतर हज यात्रेतील ‘मेहरम’ प्रथा बंद, मोदींची घोषणा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel America War: इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
बदाम काजू पिस्ता ते खजूरच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ, इराण इस्त्रायल युद्धाचा मोठा परिणाम 
बदाम काजू पिस्ता ते खजूरच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ, इराण इस्त्रायल युद्धाचा मोठा परिणाम 
साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती; केदारनाथ मंदिर प्रवेशासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार? 
साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती; केदारनाथ मंदिर प्रवेशासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार? 
सोनं चांदीपेक्षा नेहमीच महाग का असतं? किंमतीतील मोठ्या फरकामागे नेमकी काय आहेत कारणं? 
सोनं चांदीपेक्षा नेहमीच महाग का असतं? किंमतीतील मोठ्या फरकामागे नेमकी काय आहेत कारणं? 

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE
Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report
Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report
Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: इस्त्रायलनं जगातील सर्वात मोठ्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला करताच इराणच्या संतापाचा उद्रेक, थेट कतारचा गॅस टार्गेट केला; आता ट्रम्प यांनी 'मला माहीत नाही' म्हणत सपशेल हात झटकले!
इस्त्रायलनं जगातील सर्वात मोठ्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला करताच इराणच्या संतापाचा उद्रेक, थेट कतारचा गॅस टार्गेट केला; आता ट्रम्प यांनी 'मला माहीत नाही' म्हणत सपशेल हात झटकले!
Iran Israel America War: इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Dhananjay Sawant Car Accident : माजी मंत्र्याचा पुतण्याचा बारामतीजवळ भीषण अपघात; फॉर्च्युनर कारला कंटेनरची धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा
माजी मंत्र्याचा पुतण्याचा बारामतीजवळ भीषण अपघात; फॉर्च्युनर कारला कंटेनरची धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा
Gudi Padwa 2026: गिरगावातील शोभायात्रेत बुलेट राणींचा जलवा, पारंपारिक वेशात वेधलं सर्वांचं लक्ष; PHOTO
गिरगावातील शोभायात्रेत बुलेट राणींचा जलवा, पारंपारिक वेशात वेधलं सर्वांचं लक्ष; PHOTO
Super Duperr Trailer Released: एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
Aishwarya Rai Bacchan Ponniyan Selvan Look: ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की..., ओळखलं का कोण?
ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की...
Nashik Crime News: कौटुंबिक वाद टोकाला, मुलाने जन्मदात्या बापाच्या पोटात खुपसला चाकू, दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा अंत
कौटुंबिक वाद टोकाला, मुलाने जन्मदात्या बापाच्या पोटात खुपसला चाकू, दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा अंत
Maharashtra Weather Update :विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात गारपीट अन् पावसाची हजेरी; रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका, बळीराजा हवालदील
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात गारपीट अन् पावसाची हजेरी; रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका, बळीराजा हवालदील
Embed widget