एक्स्प्लोर
येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली
येत्या वर्षात 70 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज (गुरुवार) संसदेत मांडलं. यावेळी येत्या वर्षात 70 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे.
मोदी सरकारनं यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देण्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार असल्याचंही जाहीर केलं आहे. सध्याच्या नोकरदारांसाठी पीएफमध्ये सरकारचा वाटा 8.33 टक्के इतका आहे.
आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासंबंधी जेटलींनी केलेले दावे अतिशय महत्वाचे आहेत. कारण विरोधकांनी नव्या रोजगार निर्मितीवरुन सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगार निर्मितीचं मोठं आव्हान मोदी सरकारसमोर असणार आहे.
याशिवाय जेटलींनी देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची गरज असल्याचं म्हणत अनेक मोठे दावे केले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील चार वर्षात 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्री नर्सरी ते 12वी पर्यंतचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबतही जेटलींनी यावेळी भाष्य केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement