नवी दिल्लीः जुनी कार विकून त्या बदल्यात तुम्हाला नवीन कार घेता येणार आहे. केंद्र सरकार लवकरच अशी एक योजना आणत आहे. यामुळे कार घेणाऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत.


 

जुनी गाडी भंगारात विकून नवीन गाडीची एक्स्चेंज ऑफर आणण्याचा सरकारचा विचार आहे. या योजनेनुसार ग्राहक वेगवेगळे लाभ मिळवू शकतात.

 

अशी आहे योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची कार 31 मार्च 2005 पूर्वीची असणं गरजेचं आहे. गाडी कलेक्शन सेंटरमध्ये जमा केल्यानंतर ग्राहकाला एक प्रमाणपत्र देण्यात येईल. नवीन कार खरेदी करताना ग्राहकाला हे प्रमाणपत्र आपल्या ओळखपत्रासह डीलरला दाखवावं लागेल. त्यानंतर कंपनी योजनेनुसार गाडी देईल.

 

असे आहेत फायदे

या योजनेनुसार जुन्या गाडीची किंमत चांगली मिळेल. नवीन कार खरेदी करताना 8 ते 12 टक्के सवलत देण्यात येईल. करावर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी गाडी सरकारी कलेक्शन सेंटरवर घेऊन जावी लागेल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर जुन्या गाडीचा मोबदला दिला जाईल.

 

केंद्र सरकारने या योजनेसाठी कंसेप्ट नोट तयार केली आहे. ज्याद्वारे लोकांचे मत जाणून घेतले जात आहेत.