झाकीर नाईकच्या 'पीस' टीव्हीच्या प्रसारणावर बंदी
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 06:22 PM (IST)
नवी दिल्ली: झाकीर नाईक ज्या 'पीस' टीव्ही वाहिनीवरुन चिथावणीखोर भाषणं देतो, त्याचं प्रसारण करणाऱ्या केबल टीव्ही ऑपरेटर्सवर कडक कारवाईचे आदेश माहिती आणि प्रसारण खात्यानं दिले आहेत. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ही घोषणा केली. पीस टीव्हीला माहिती आणि प्रसारण खात्याची परवानगी मिळालेली नाही. तरीही देशभरातील केबल ऑपरेटर्स अवैधपणे त्याचं खुलेआम प्रसारण करत आहेत. त्यामुळं झाकीर नाईकची चिथावणीखोर भाषणं सहजासहजी लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं दिसतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाकीर नाईकच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रानं नाईकच्या पीस टीव्हीचा निकाल लावला आहे.