एक्स्प्लोर

आजारी नेत्यांमुळे मोदी सरकार चिंतेत!

अलिकडचे काही दिवस भाजप नेत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरत आहेत. महत्त्वाचे अनेक नेते आजारी असल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली : 2019 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यात होणार आहे. तर निवडणुकीआधी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अलिकडचे काही दिवस भाजप नेत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरत आहेत. महत्त्वाचे अनेक नेते आजारी असल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे. भाजपचे कोणकोणते नेते आजारी? अमित शाह  भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्लूमुळे अमित शाह पुढील दोन-तीन दिवस ते हॉस्पिटलमध्येच राहण्याची शक्यता आहे. अरुण जेटली केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही आजारी आहेत. कॅन्सरचं निदान झाल्यावर ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहे. त्याआधी 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या गैरहजेरीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रवीशंकर प्रसाद श्वसननलिकेत त्रास होत असल्याने केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनाही सोमवारी (14 जानेवारी) एम्समध्ये दाखल केलं होतं. त्यांना आयसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आगामी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये प्रकृती बिघडल्याने सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होत. माझी किडनी निकामी झाली असून डायलिसिसवर असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून सार्वजनिक कार्यक्रमात त्या फारच कमी दिसतात. रामलाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव रामलाल यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना नोएडामधील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर 2018 च्या सुरुवातीला त्यांच्या तीन महिने उपचार सुरु होते. यानंतर एम्समध्येही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ते ड्रिप लावून मंत्रालयात पोहोचले होते. संबंधित बातम्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान, अमेरिकेला गेल्याने अर्थसंकल्पाला मुकणार? मनोहर पर्रिकरांना स्वादुपिंड कर्करोग, गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचा खुलासा दिल्लीत स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget