नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात केलेल्या कपातीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कर्माचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करणं सरकारचा हा निर्णय असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आजही त्यांनी महागाई भत्त्याच्या कपातीविषयी ट्विट करुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.


अर्थमंत्रालायाने दिलेल्या आदेशात सांगितले होते की, कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी जानेवारी, जुलै आणि पुढील वर्षी जानेवारीला मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त हप्ता दिला जाणार नाही.

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले, कोरोनाच्या संकटात देखील केंद्र सरकारने 20 हजार कोटीचा केंद्रीय व्हिस्टा प्रकल्प स्थगित केला नाही. तसेच 1 लाख 10 हजार कोटीचा प्रकल्प थांबविला नाही आणि कोणत्याच सरकारच्या अतिरिक्त खर्चात कपात केल्यााची घोषण केली नाही. ज्यामुळे सरकारचे वर्षाला 2 लाख 50 हजार कोटी वाचू शकतात. राहुल गांधी यांचं हे ट्विट प्रियंका गांधी यांनीही रिट्विट केलं आहे.

संबंधित बातम्या :