नवी दिल्ली : ब्रिटीश काळापासून सुरु असलेल्या दोन परंपरा मोदी सरकारने मोडीत काढल्या आहेत. एक म्हणजे रेल्वे बजेट इतिहासजमा झालं आहे, तर दुसरं म्हणजे मार्चअखेरीस सादर होणारं बजेटही यंदापासून 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.


यावर्षीपासून सर्वसाधारण बजेटमध्ये रेल्वे बजेट समाविष्ट करण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्वसाधारण अर्थसंकल्प मार्चअखेर ऐवजी एक फेब्रुवारीलाच म्हणजे दोन महिने आधी सादर करण्यात आला.

केंद्रीय अर्थ विभागाने माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीनं सध्याचं आर्थिक वर्ष आणि विचाराधीन असलेलं आर्थिक वर्ष याबाबतचा अभ्यास करुन याबाबत अहवाल दिला होता.

या समितीमध्ये माजी कॅबिनेट सचिव के एम चंद्रशेखर, तामिळनाडूचे माजी अर्थसचिव पी व्ही राजारमण आणि सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे वरिष्ठ डॉ. राजीव कुमार यांचा समावेश होता.

कोणत्या मुद्द्यांवर अभ्यास?

*केंद्र आणि राज्य सरकारचा जमा-खर्चाचा ताळेबंद
*विविध कृषी सत्रांवर काय परिणाम होईल.
*आर्थिक वर्ष आणि प्रत्यक्ष कामकाजावर होणारा परिणाम
*टॅक्स प्रणाली आणि प्रक्रिया
*बजेटशी संबंधित सर्व बाजू पडताळणे

आर्थिक वर्ष आणि कॅलेंडर वर्ष

भारतात आर्थिक वर्ष आणि कॅलेंडर वर्ष आहे. म्हणजे 1 जानेवारीला कॅलेंडर वर्ष सुरु होतं ते 31 डिसेंबरपर्यंत असतं. तर आर्थिक वर्षाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असतो. भारतात दोन कॅलेंडर वर्षाची सुरुवात 1867 मध्ये झाली होती. त्यापूर्वी आर्थिक वर्ष 1 मे ते 30 एप्रिल होतं. त्यानंतर त्यामध्ये बदल होत गेले.

अटल बिहारी वाजपेयींकडून परंपरा मोडीत

यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी बजेटची परंपरा मोडीत काढली होती. वाजपेयी सरकारने (1999-2004) सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याची संध्याकाळची वेळ बदलून सकाळी 11 ची केली होती.

इंग्रजांनी संध्याकाळी पाच वाजताची वेळ ही ब्रिटन संसदेला लक्षात घेऊन ठेवली होती. ती वेळ वाजपेयी सरकारने बदलली होती. भारतीय नागरिकांच्या सोयीप्रमाणे वेळ हवी म्हणून सकाळी बजेट सादर करण्यास सुरुवात झाली होती.

संबंधित बातम्या :


मध्यमवर्गीयांना दिलासा, सर्व बजेट एकत्र


बजेटमधील तुमच्या फायद्याच्या 10 महत्वाच्या गोष्टी


अर्थसंकल्पामुळे काय महाग, काय स्वस्त?


3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात


ई-तिकीटासाठी सेवाकर नाही, रेल्वे बजेटमध्ये घोषणा


ऐतिहासिक शब्दाची व्याख्या स्पष्ट करणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री


नोटाबंदी गेल्या बजेटमध्ये का जाहीर केली नाही? : उद्धव ठाकरे


हा 'शेर ओ शायरी'चा अर्थसंकल्प : राहुल गांधी