Harnaaz Sandhu Video: अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' (Miss Universe 2022) या स्पर्धेची विजेती ठरली आहे. आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्स 2022 मुकुट माजी मिस युनिव्हर्स भारताची हरनाज कौर संधूच्या हस्ते देण्यात आला. हा ताज प्रदान करताना हरनाजही खूप भावूक झाली. या खास प्रसंगी हरनाज जबरदस्त ड्रेसमध्ये दिसली. तिचा पेहराव अगदी अनोखा होता, शिवाय या माध्यमातून तिनं भारतातून मिस युनिव्हर्स झालेल्या सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांना सलाम केल्याचं दिसून आलं.
माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या ड्रेसवर एक खास चित्र छापण्यात आले होते. या मोठ्या मंचावर हरनाजने सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांचा सन्मान केल्याचं दिसलं. मिस युनिव्हर्स 1994 सुष्मिता सेन आणि मिस युनिव्हर्स 2000 लारा दत्ताचा फोटो हरनाजच्या ड्रेसच्या मागच्या बाजूला दिसून आला. भारताने तीन वेळा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.
या खास प्रसंगी माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने काळा आणि चंदेरी कलरचा सुंदर गाऊन परिधान केला होता. जे हेवी फ्लो मटेरियलने तयार केले होते. हा ड्रेस सई शिंदेने डिझाइन केला आहे. भारताच्या दिविता रायने टॉप 16 मध्ये स्थान मिळवले, पण ती पुढे जाऊ शकली नाही. या स्पर्धेत दिविताने नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये सोन चिरय्या बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिविता राय या व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे.
15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या समारंभात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला. 'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या. भारताची दिविता राय टॉप 16 मध्ये पोहोचली पण टॉप-5 मध्ये तिला स्थान मिळाले नाही.
भारताच्या हरनाज संधूनं यावेळी आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. या स्पर्धेची मिस डोमिनिकन रिपब्लिक एंड्रीना मार्टिनेझ ही दुसरी रनर-अप ठरली, तर पहिली रनर-अप मिस व्हेनेझुएला अमांडा दुडामेल ही ठरली. व्हेनेझुएला, अमेरिका, प्यूर्टो रिको, क्रयुरासाओ आणि डोमेनिकन रिपब्लिक या देशांच्या स्पर्धकांनी टॉप-5 स्पर्धांच्या यादीत स्थान मिळवले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Miss Universe 2023 : कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचे प्रतिनिधित्व