Mirza Ghalib Death Anniversary: 'पूछते हैं वो कि गालिब कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या.' मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' (Mirza Ghalib) या नावाने ओळखतो. आज 15 फेब्रुवारी 2023 ला गालिब यांची 154 वी पुण्यतिथी आहे. मिर्झा गालिब यांचे 15 फेब्रुवारी 1869 रोजी निधन झाले. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्याजवळ त्यांची समाधी बांधलेली आहे. त्यांच्या शायरीतून ते आजही सर्वांच्या हृदयात जिवंत आहे.


मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी उत्तरे प्रदेशमधील आग्रा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला बेग आणि आईचे नाव इज्जत उत निसा बेगम होते. गालिब जेव्हा फक्त 5 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. पण काही काळाने काकांचंही निधन झालं. त्यानंतर ते आपल्या आजोबांकडे आले. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी वयाच्या 11 व्या वर्षी उर्दू आणि पर्शियन भाषेत शायरी आणि गझल लिहायला सुरुवात केली. ते असे शायर होते की, उभ्या उभ्या गझल रचायचे. यामुळेच गालिब हे भारत-पाकिस्तानसह जगभरातील कोट्यवधी लोकांचे आवडते शायर आहेत. गालिब यांच्या अनेक गझल आणि शेर लोकांना तोंडपाठ आहेत. 1850 मध्ये अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफरने मिर्झा गालिब यांना दबीर-उद-मुल्क आणि नज्म-उद-दौला या पदव्या बहाल केल्या होत्या. यानंतर त्यांना मिर्झा नोशा ही पदवीही मिळाली.


उर्दू भाषेचे शायर म्हणून मिर्झा गालिब (Mirza Ghalib Shayari) यांचे नाव आजही लोक आदराने घेतात. पण तुम्हाला माहित आहे का मिर्झा गालिब यांनी केवळ गझल आणि शायरीच नाही तर अनेक पत्रेही लिहिली आहेत. त्यांच्या पत्रांबद्दल असं म्हटलं जातं की, गालिबचं पत्र वाचल्यावर गालिब वाचकाशी बोलत असल्याचा भास होतो. गालिब यांनी गझल लिहिली नसती तर त्यांची पत्रे खूप प्रसिद्ध झाली असती, असेही म्हटले जाते. 


SHAYARI OF MIRZA GHALIB: गालिब यांचे काही निवडक शेर 


हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है. 


हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. 


उन के देखे से जो आ जाती है मुँह पर रौनक़,
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है.


न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता, 
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता.


बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे,
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे.