Air India-Airbus Deal:  टाटा समूहने (Tata group) आतापर्यंतची सर्वात मोठी विमान वाहतूक डील केली आहे. टाटा सन्स एअरबसकडून 250 विमानं खरेदी करणार आहे. यामध्ये एअर इंडिया 40 A350 विमानं आणि 210 मध्यम श्रेणीतील विमानं खरेदी करणार. ज्यात 140 A320 आणि 70 A321 विमानं असणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, "एअर इंडियाने एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 40 वाइड बॉडी विमाने असतील." ते म्हणाले की, विमान कंपनी आपला ताफा आणि ऑपरेशन्स वाढवण्याची तयारी करत आहे. टाटा समूहाच्या मालकीखाली आल्यानंतर एअर इंडियाची ही पहिली ऑर्डर असेल.


हा करार केवळ टाटा समूहासाठीच नाही तर भारताच्या विमान वाहतूक बाजारासाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीही त्याचे कौतुक केले आहे. येत्या दीड दशकात भारताला 2,000 हून अधिक विमानांची गरज भासेल, असे ते म्हणाले आहे. या संदर्भात नवीन करार अतिशय महत्त्वाचा आहे. या कराराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी हा करार ऐतिहासिक असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा करार भारत आणि फ्रान्समधील संबंध, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील भारताचे यश आणि अपेक्षा प्रतिबिंबित करतो. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील या ऐतिहासिक कराराबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. या कार्यक्रमासाठी आमच्यात सामील झाल्याबद्दल माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे विशेष आभार."


Air India-Airbus Deal: 8 वर्षांत भारतातील विमानतळांची संख्या 74 वरून 147 पर्यंत वाढली 


पंतप्रधान म्हणाले की, आज भारताचे नागरी विमान वाहतूक क्षेत्र हे देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे आणि ते मजबूत करणे हा सरकारच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ते म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत भारतातील विमानतळांची संख्या 74 वरून 147 वर पोहोचली आहे. ते म्हणाले की, देशाच्या दुर्गम भागांना प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेद्वारे हवाई मार्गाने जोडले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळत आहे. ते म्हणाले, “नजीकच्या काळात भारत या क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार