बंगळुरु : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय बंगळुरुतील रस्त्यावर आला. थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चमत्कारीक पद्धतीने एक बाळ वाचल्याचं दिसत आहे.

बंगळुरुतील रस्त्यावर दाम्पत्य त्यांच्या बाळासह दुचाकीवरुन प्रवास करत होतं. ही भरधाव दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या एका दुचाकीला जोरात धडकली आणि दाम्पत्य जागेवरच खाली पडलं. धक्कादायक म्हणजे दुचाकी तशीच पुढे निघून गेली आणि त्यावर बाळ तसंच बसून होतं.

हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. रस्त्याने इतर वाहनंही दिसत आहेत. मात्र ही भरधाव दुचाकी तशीच पुढे गेली आणि काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला पडली. सुदैवाने दुचाकीवर असलेलं बाळ रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतावर पडल्याने सुखरुप वाचलं.

काही वृत्तांनुसार, दुचाकीवरुन पडलेल्या दाम्पत्याला या घटनेत दुखापत झाली आहे, तर बाळालाही किरकोळ दुखापत झाली. मात्र गवतावर पडल्यामुळे बाळाला फार मार लागला नाही. रस्त्याने चालणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :