नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. परीक्षा वर्षातून दोनदा आणि ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मोठा यू टर्न घेतला आहे.
सात जुलैला पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे केलेली घोषणा मागे घेण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्रालयावर आली आहे. नीटची परीक्षा ऑनलाईन नव्हे, तर पेन, पेन्सिलद्वारेच होणार असल्याचंही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
यंदा नीटची परीक्षा 5 मे रोजी होईल, तर निकाल 5 जून रोजी लागणार आहे.
दरम्यान, जेईई परीक्षा मात्र घोषणा केल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा होणार आहे. शिवाय ही परीक्षा ऑनलाईन होईल. जेईईची पहिली मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी 6-20 जानेवारी आणि निकाल 31 जानेवारी रोजी जाहीर होईल. तर जेईईची दुसरी मुख्य परीक्षा 6 ते 20 एप्रिलला होणार असून निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर होईल.
नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2018 06:55 PM (IST)
परीक्षा वर्षातून दोनदा आणि ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मोठा यू टर्न घेतला आहे. सात जुलैला पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे केलेली घोषणा मागे घेण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्रालयावर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -