एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांचाही राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. आता केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : येत्या 3 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्याआधीचा केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आज (शुक्रवार) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) राजीव प्रताप रुडींनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच उमा भारती यांनीदेखील आरोग्याचं कारण पुढे करत आपला राजीनामा सादर केला आहे. उमा भारती यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. आता त्यापाठोपाठ बंडारु दत्तात्रेय यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक मोठ्या घडामोडी सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता होणार असल्याचं समजतं आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद येण्याची चिन्हं आहेत. विस्ताराआधी दिल्लीत नव्या नावांच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रातून संघाच्या मुशीतून घडलेले विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे अनिल देसाई, आनंदराव अडसूळ यांच्यासह मराठा समाजाचा चेहरा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचंही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे शिवसेनेला अजून दोन मंत्रिपदांची अपेक्षा आहे. एकीकडे 12 खासदार असलेल्या जेडीयूला जर 2 मंत्रिपदं मिळत असतील तर त्यापेक्षा दुप्पट खासदार असून शिवसेनेवर अन्याय का? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे मंत्रिपदी राज्यसभेच्या खासदारांची वर्णी लावणार की लोकसभेवरच्या नेत्यांना संधी देणार याचीही उत्सुकता आहे. संबंधित बातम्या : केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा उमा भारतींसह चार मंत्र्यांचा राजीनामा सादर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, डिलिव्हरी आणि गॅस बुकिंगवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती
1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, डिलिव्हरी आणि गॅस बुकिंगवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
Embed widget