इटानगर: अरुणाचलमध्ये वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळच्या खिरमू परिसरात हा अपघात झाला.

सकाळी सहाच्या सुमारास Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं.

तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या सीमेपासून अवघ्या 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आहे.

या दुर्घटनेनंतर वायूदलाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे. हे हेलिकॉप्टर आर्मीसाठी एअर मेंटेनेंस साहित्य घेऊन जात होतं.

‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाईदलाचा कणा मानलं जातं. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्यानं लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो. त्यामुळे आजचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरू आहे.